आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पीटर-मारियांच्या संबंधामुळे बदली - माजी पोलिस आयुक्त सत्यपाल सिंह

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - हायप्रोफाइल शीना बोरा हत्याकांडाचा तपास करणारे मुंबई पोलिस आयुक्त राकेश मारिया यांची होमगार्ड पोलिस महासंचालक पदी तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. अहमद जावेद यांची मुंबई पोलिस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी
मंगळवारी दुपारी 2.30 च्या दरम्यान पदाची सूत्रे स्वीकारली. पोलिस प्रशासनाच्या कारभारात पारदर्शकता आणणार असल्याचे अहमद म्हणाले. त्यासोबत मुंबईत महिला आणि मुलांच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पीटर-मारियांचे जवळचे संबंध -सत्यपालसिंह
शीना बोरा हत्याकांडाचा तपास सुरु असताना मारियांची बदली करण्याची सरकारला एवढी काय घाई झाली होती, असा सवाल उपस्थित केला जात असताना, एका वृत्त वाहिनीने मुंबईचे माजी पोलिस आयुक्त आणि भाजप खासदार सत्यपाल सिंह यांच्या हवाल्याने म्हटले आहे, की इंद्राणीचा पती स्टार इंडियाचा माजी सीईओ पीटर मुखर्जी आणि राकेश मारिया यांचे जवळचे संबंध आहे. त्याचा परिणाम तपासावर होण्याची शक्यता असल्याने महाराष्ट्र सरकारने त्यांना आयुक्त पदावरुन दूर केले आहे. दुसरीकडे माजी पोलिस आयुक्त ज्युलियो रिबेरो यांनी अहमद यांच्या नियुक्तीचे स्वागत केले आहे. मारिया यांची मुंबई पोलिस आयुक्तपदी नियुक्त करण्यात आली होती तेव्हा अहमद यांना डावलण्यात आल्याची चर्चा होती.


मारियांची बदली का ?

राकेश मारिया यांचा कार्यकाळ 30 सप्टेंबर पर्यंत आहे. त्याआधीच त्यांना प्रमोशन देऊन त्यांची बदली केल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. नियमानूसार राज्य सरकारला जर त्यांना बढती द्यायची होती तर महासंचालक पदी बढती देऊन ही ते त्यांना मुंबई पोलिस आयुक्तपदी कायम ठेवू शकत होते. सध्या ते एडीजी रँकचे अधिकारी आहेत.
शीना मर्डर केसमध्ये मारिया स्वतः चौकशी करत होते. या प्रकरणातील मुख्य आरोपी इंद्राणीला अटक केल्यानंतर अनेकदा त्यांनी खार पोलिस स्टेशनला येऊन तिची स्वतः चौकशी केली होती. त्यांचा आयुक्तपदाचा कार्यकाळ 30 सप्टेंबरपर्यंत आहे, याची त्यांनाही जाणिव होती. त्यामुळे कार्यकाळ संपायच्या आत हे प्रकरण तडीस लावले जाईल असे ते म्हणाले होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जपान दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी त्यांनी हा महत्त्वपूर्ण बदल केला आहे. अहमद जावेद हे 1980 च्या आयपीएस बॅचचे अधिकारी आहेत. मुंबई पोलिस आयुक्तपदी बदली होण्यापूर्वी ते होमगार्डचे पोलिस महासंचालक होते.

पुढील स्लाइडमध्ये, मुख्यमंत्री होते नाराज