आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

\'श्रीश्रींच्‍या कार्यक्रमात \'पाकिस्तान जिंदाबाद\'चे नारे लागले, मला तुरुंगात टाकले असते\'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - आपण "जय हिंद' म्‍हणू पण "भारत माता की जय' म्‍हणणार नाही या मतावर एमआयएमचे आमदार वारिस पठाण ठाम आहेत. विशेष म्‍हणजे जेएनयूमध्‍ये देशविरोधी नारेबाजीच्‍या मुद्द्यावर मोदी सरकारचा विरोध करणारी कॉंग्रेस विधानसभेत वारिस पठाण यांच्‍या विरोधात उभी राहिली आहे. पठाण म्‍हणाले लोकशाहीसाठी काळा दिवस..
- आमदार वारिस पठाण यांना बुधवारी अधिवेशन संपेपर्यंतच्या काळासाठी सभागृहातून निलंबित करण्यात आले.
- गुरुवारी पठाण म्‍हणाले, ''देशाच्‍या गृहमंत्र्यांच्‍या उपस्‍थितीत श्रीश्री रविशंकर यांच्‍या कार्यक्रमात पाकिस्तान जिंदाबाद असे नारे लागतात. मी तसे केले असते तर, मला तुरुंगात टाकले असते. ''
- निलंबनानंतर पठाण म्‍हणाले, ''मी जय हिंद म्‍हणायला तयार आहे, विरोध फक्‍त यासाठी आहे की, काही लोक आमच्‍या तोंडून जबरीने भारत माता की जय बोलून घेण्‍यास इच्‍छूक आहेत. ''
- ''माझे निलंबन हे महाराष्‍ट्र आणि देशाच्‍या लोकशाहीसाठी काळा दिवस आहे.''
- एआयएमआयएमचे आमदार पठाण यांनी मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटण्‍यासाठी वेळ मागितली आहे.
- इतिहासकार राजचंद्र गुहा यांनी पठाण यांचे निलंबन हे कायद्याच्या विरोधात असल्‍याचे म्‍हटले आहे.
असा पेटला वाद..
- राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चेत एमआयएम आमदार इम्तियाज जलील यांनी राज्यात महापुरुषांची स्मारके उभारण्यापेक्षा त्या पैशातून रुग्णालये बांधा, पक्षाच्या पैशातून स्मारके बांधा असे वक्तव्य केले.
- अभिभाषणात शिवाजी महाराज, गोपीनाथ मुंडे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकांचा उल्लेख होता.
- यावर शिवसेनेचे गुलाबराव देवकर यांनी आक्षेप घेत "महापुरुषांबद्दल आदर नाही का, भारतमाता की म्हणणार नाही का?' असा प्रश्न केला.
- यावर वारिस पठाण यांनी तत्काळ उठून आक्षेपार्ह घोषणा दिली आणि वाद पेटला.
हे निलंबन चुकीचेच..
माझे भाषण सुरू असताना राम कदम यांनी पठाण यांना ‘भारत माता की जय’ म्हणण्याची बळजबरी केली. त्यानंतरचा संवाद अधिकृत कामकाजाचा भाग नाही. त्यावरून कुणाला निलंबित कसे केले जाऊ शकते? असे एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील म्हणाले. ही कारवाई चुकीची असल्याचे त्यांनी नमूद केले.
पुढे वाचा, काय म्‍हणाले होते ओवेसी.., जावेद अख्‍तर यांनी कसा साधला निशाणा.., एकनाथ खडसे काय म्‍हणाले.., अब्दुल सत्तार यांनी केली पठाण यांच्या निलंबनाची मागणी.., संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट काय म्‍हणाले..