आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jawan Victim Of Politics Raj Thackary\'s Allegation

फेरीवाल्‍यांच्‍या मोर्चाला मनसे स्‍टाईल उत्तर देऊ- राज ठाकरेंचा इशारा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई -‘मुंबईतील अनधिकृत फेरीवाल्यांवर होणा-या कारवाई विरोधात जर फेरीवाल्यांनी आझाद मैदानात मोर्चा काढला तर त्यांना मनसे आपली ताकद दाखवेल’, असा इशारा मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिला. तसेच सीमेवरील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर मृत्युमुखी पडलेले जवान शहीद आहेत की सरकारच्या राजकारणाचे बळी ? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

सांताक्रूझ येथील अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करताना एका फेरीवाल्याचा मृत्यू झाल्यामुळे सहायक पोलिस आयुक्त वसंत ढोबळे यांची बदली करण्यात आल्याबद्दल राज यांनी नाराजी व्यक्त केली. अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करणा-या ंची बदली होत असेल तर यापुढे अशी कारवाई कोण करणार? असा सवाल
करून यामुळे पोलिस दलाचे खच्चीकरण करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी केला.
राजीनामा का दिला?
‘ढोबळेंची बदली मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या अधिकारात केल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार सांगतात. मग श्वेतपत्रिका काढण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा होता तेव्हा तुम्ही का राजीनामा दिलात?,’ अशी विचारणा राज यांनी अजित पवारांना केली.
‘जे अनधिकृत आहे ते हटवलेच पाहिजे’
शहरांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात दोन टक्के फेरीवाले असावेत असा प्रस्ताव राष्ट्रपतींकडे मान्यतेसाठी पाठवण्यात आला आहे. हे परप्रांतीयांना मतांसाठी शहरात वसवण्याचे षड्यंत्र असल्याचा आरोप राज यांनी केला. मराठी फेरीवाल्यांची अडवणूक परप्रांतीयांकडून होत आहे. जर फेरीवाल्यांवरील कारवाईविरोधात या परप्रांतीयांनी सोमवारी आझाद मैदानात मोर्चा काढला तर त्यांना मनसेही रस्त्यावर उतरून आपली ताकद दाखवेल, असा सज्जड इशाराही राज यांनी दिला. जे अनधिकृत आहे ते हटवणे आवश्यक असून अनधिकृत रिक्षा आणि टॅक्सीवाल्यांवरही प्रशासनाने कारवाई करावी, अशी अपेक्षा राज यांंनी व्यक्त केली. या भूमिकेमुळे राज ठाकरे यांनी पुन्हा परप्रांतियांविरोधात मोहिम सुरू केल्याचे मानले जाते.

समझोता एक्स्प्रेस, बससेवा सुरू का केली?
दोन भारतीय जवानांच्या हत्येबाबत राज म्हणाले की, हे जवान शहीद आहेत की राजकारणाचे बळी? देशातील प्रश्नांवरून लोकांचे लक्ष वळवण्यासाठी सीमेवर या गोष्टी घडवल्या जातात. जर सरकार संवेदनशील असते तर पुढे काही पावले का उचलली जात नाहीत? हॉकी क्रिकेट सुरू रहाते आणि जवानांचा बळी जातो, सरकार का ठोस भूमिका घेत नाही? रालोआ सरकारच्या काळात सुरू केलेल्या समझोता एक्स्प्रेस आणि बसगाड्यांवरही त्यांनी टीका केली. कोणी या गाड्या सुरू करायला सांगितल्या होत्या?