आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जय आणि माही विज ‘नच बलिये’चे विजेते

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - छोट्या पडद्यावर लोकप्रिय ठरलेल्या ‘नच बलिये’ रिअ‍ॅलिटी शो सेशन पाचच्या विजेतेपदावर जय भानुशाली आणि माही विज यांनी नाव कोरले. 50 लाख प्रेक्षकांनी या जोडीच्या पारड्यात पसंतीची मते टाकली. सर्वाधिक मते मिळाल्याने जय आणि माहीची निवड करण्यात आली.
विजेत्या जोडीला 50 लाखांचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ग्रँड फायनल आणि एकूण शोदरम्यान जज म्हणून भूमिका पार पाडणार्‍या अभिनेत्री शिल्पा शेट्टीने तब्बल तीन वर्षानंतर ‘चिकनी चमेली’, ‘चिपकाले फेव्हिकॉल से’ आणि ‘आई हू मै यूपी-बिहारसे’ या गाण्यावर स्टेजवर जोरदार ठुमके लावून उपस्थितांना घायाळ केले. या कार्यक्रमात सुपरस्टार अजय देवगण आणि तमन्ना भाटिया यांनी हजेरी लावून त्यांच्या हिम्मतवाला चित्रपटाचे प्रमोशन केले, तर जज म्हणून साजिद खान आणि टरेंस लिवींस यांचीही उपस्थिती होती.-