आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवाजी पार्कवर बाळासाहेबांचे स्‍मारक नको, जयदेव ठाकरे यांची भूमिका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- शिवसेनाप्रमूख बाळासाहेब ठाकरे यांच्‍या पहिल्‍या स्‍मृतीदिनी त्‍यांचे ज्‍येष्‍ठ चिरंजीव जयदेव ठाकरे यांनी स्‍मारकाबाबत घेतलेल्‍या भूमिकेमुळे एकच खळबळ उडाली आहे. शिवाजी पार्क हे मैदान आहे. तिथे शिवाजी महाराजांशिवाय इतर कोणाच्‍या पुतळयाची गरज नाही. तिथे स्‍मृतीउद्यानापर्यंत ठीक आहे. पण स्‍मारकाची काहीच गरज नाही. बाळासाहेबांनादेखील हे कधीच मान्‍य झाले नसते, असे मत त्‍यांनी व्‍यक्‍त केले.

राजकारणापासून दूर राहणा-या जयदेव ठाकरे यांनी मांडलेल्‍या या मतांमुळे सर्वांच्‍याच भुवया उंचावल्‍या आहेत. एका वृत्तपत्राला दिलेल्‍या मुलाखतीत तसेच पत्रकारांशी त्‍यांनी याविषयी आपले मत मांडले. बाळासाहेबांच्‍या स्‍मारकाला जागा मिळण्‍यास होत असलेल्‍या विलंबास त्‍यांनी अप्रत्‍यक्षरित्‍या शिवसेनेवरही टीका केली. अनेक वर्षांपासून शिवसेनेची मुंबईत सत्ता आहे. त्‍यांची इच्‍छा असती तर त्‍यांनी वर्षभरात महापौर निवासात अथवा पालिकेच्‍या जागेत त्‍यांचा पुतळा किंवा स्‍मारक उभारला असता. परंतु, सत्ता असतानाही त्‍यांना साहेबांचे चांगले स्‍मारक कसे उभारता आले नाही, असा सवाल त्‍यांनी यावेळी उपस्थित केला. शिवाजी पार्क हे मैदान राहण्‍याबरोबरच रेसकोर्सवर कोणत्‍याही प्रकारचे उद्यान उभारण्‍यास त्‍यांनी स्‍पष्‍ट विरोध दर्शवला आहे. अधिक वाचण्‍यासाठी क्लिक करा पुढच्‍या स्‍लाईडला...