आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jayprabha Studio Land Issue, Lata Mangeshkar In Court

जयप्रभा स्टुडिओ जमीनप्रकरणी लतादीदींना कोर्टाचा दिलासा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- कोल्हापूर येथील जयप्रभा स्टुडिओच्या जमिनीच्या मालकीप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने लता मंगेशकर यांना दिलासा दिला आहे. महाराष्ट्र सरकारने 1982 ला या जमिनीच्या वापरकर्त्यामध्ये बदल करण्यास परवानगी दिल्याप्रकरणी दाखल झालेली जनहित याचिका न्यायालयाने फेटाळली आहे.
याचिकाकर्ते अशा प्रकारे सरकारचा निर्णय रद्द करण्याची मागणी करू शकत नाहीत, असे न्यायमूर्ती एस. जे. वजिफदार आणि गौतम पटेल यांनी निर्णयात स्पष्ट केले. अखिल भारतीय चित्रपट महामंडळाने ही जनहित याचिका दाखल केली होती. लता मंगेशकर यांच्या बाजूने सरकारने निर्णय दिल्याचा आरोप त्यात करण्यात आला होता.
लता मंगेशकर यांनी ही 13 एकर जमीन 1959 मध्ये प्रसिद्ध निर्माते दिग्दर्शक भालजी पेंढारकर यांच्याकडून खरेदी केली होती, तर पेंढारकर यांनी चित्रनगरी उभारण्याच्या अटीवर कोल्हापूर संस्थानाकडूही जमीन मिळवली होती.