आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जेटने आठवलेंना विमान प्रवेश नाकारला, कार्यकर्ते अाक्रमक, कंपनीकडून माफी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - रिपाइं नेते रामदास आठवले यांना जेट एअरवेजने बोर्डिंग पास जारी करूनही ऐनवेळी विमानात बसू दिले नाही. त्यामुळे संतापलेल्या रिपाइंच्या कार्यकर्त्यांनी विमान कंपनीच्या कार्यालयाबाहेर निदर्शने केली. त्यानंतर कंपनीच्या वतीने लेखी माफी मागण्यात अाली.

आठवले यांना दलित चळवळीतील नेते अॅड. एकनाथ आव्हाड यांच्या अंत्यसंस्कारासाठी बीड जिल्ह्यातील माजलगावला जायचे होते. त्यासाठी त्यांनी जेट एअरवेजचे औरंगाबादचे तिकीट बुक केले होते. मुंबईहून औरंगाबादकडे निघणाऱ्या विमानाची नियोजित वेळ पहाटे ५.१५ वाजता होती. आपण नियोजित वेळेच्या २७ मिनिटे आगोदर विमानतळावर पोहोचलो आणि बोर्डिंग पासही घेतला; परंतु चार ते पाच मिनिटे उशिरा आल्याचे सांगत जेट एअरवेजच्या कर्मचाऱ्यांनी आपणास विमानात प्रवेश नाकारल्याने आपणास धक्काच बसला, असे आठवले म्हणाले. जेट एअरवेजने मात्र हे आरोप फेटाळून लावले.
कर्मचाऱ्यांनी आठवलेंना वेळेत विमानतळावर पोहोचण्यास सांगितले होते. मात्र, ते पोहोचले नाहीत. आम्ही त्यांच्या पर्यायी प्रवासाची व्यवस्था करण्याची तयारीही दाखवली होती, असे जेट एअरवेजच्या प्रवक्त्याने म्हटले आहे. नंतर रिपाइंच्या संतप्त कार्यकर्त्यांनी जेट एअरवेजच्या कार्यालयासमोर निदर्शने केली. त्यामुळे जेट एअरवेजचे उपाध्यक्ष संतोष चाळके यांनी आठवले यांची दुपारी भेट घेतली. तसेच झालेल्या प्रकाराबद्दल त्यांनी लेखी माफीही मागितली.
बातम्या आणखी आहेत...