आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jet Airways Management Meet Raj Thackeray Over Recruitment Post For Pilot For Local People

राज भेटीनंतर जेट एअरवेज नरमली, परदेशी नव्हे आता मराठी वैमानिकांना देणार नोकरी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जेट एयरवेजमध्ये पायलटसह इतर पदांच्या नोकर भरतीमध्ये मराठी मुलांनाच प्राधान्य देऊ अशी ग्वाही जेट एयरवेजच्या व्यवस्थापनाने राज यांना दिली. - Divya Marathi
जेट एयरवेजमध्ये पायलटसह इतर पदांच्या नोकर भरतीमध्ये मराठी मुलांनाच प्राधान्य देऊ अशी ग्वाही जेट एयरवेजच्या व्यवस्थापनाने राज यांना दिली.
मुंबई- जेट एअरवेजमध्ये आगामी काही काळात वैमानिक नोकर भरती होणार आहे. मात्र, यात परदेशी वैमानिकांना भरती करणार असल्याचे असताच या परदेशी पायलट नोकर भरतीला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तीव्र विरोध केला. तसेच आंदोलनाचा इशारा देत मनसे स्टाईल दाखवू असा इशारा देताच जेट एअरवेजने एक पाऊल मागे घेतले. तसेच जेट एअरवेजच्या व्यवस्थापनाने राज यांच्या भेटीची वेळ मागत चर्चेची तयारी दाखवली.
त्यानुसार, राज ठाकरेंच्या भेटीला जेट एयरवेजचे व्यवस्थापन सोमवारी कृष्णकुंज येथे आले होते. त्यावेळी मनसे नेते व हवाई कर्मचारी सेनेचे अध्यक्ष नितिन सरदेसाई, विलास चव्हाण, नयन कदम, संतोष धुरी उपस्थित होते. मुंबई महाराष्ट्र सर्कलसाठी जेट एयरवेज मध्ये पायलट सह इतर पदांच्या नोकर भरतीमध्ये स्थानिक मराठी मुलांनाच घेतले पाहिजे अशी भूमिका राज यांनी मांडली. त्यानंतर स्थानिकांना प्राधान्य देऊ अशी ग्वाही जेट एयरवेजच्या व्यवस्थापनाने राज यांना दिली.
मनसेच्या दणक्याने रेल्वे प्रशासन रुळावर! 240 मराठी रेल्वे कर्मचाऱ्यांची बडतर्फी मागे
मुंबादेवी येथील वाडीबंदर (रेल्वे कारशेड) येथील 240 मराठी रेल्वे कर्मचाऱ्यांना तडकाफडकी कामावरून काढून टाकण्यात आले. सदर कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी मनसे नेते बाळा नांदगावकर, आशाताई मामिडी, केशव मुळे यांच्या नेतृत्वाखाली 4 दिवस कामगारांसह धरणे आंदोलन घेण्यात आले. तसेच वाडिबंदर रेल्वे डेपो इंचार्ज भारत झुनगरे यांना लेखी निवेदन देउन मनसे स्टाईल इशारा देण्यात आला. मनसेच्या आक्रमक व तीव्र आंदोलन पाहता रेल्वे प्रशासन व ठेकेदार यांनी नमते घेऊन लगेचच सर्वच्या सर्व 240 कामगारांना पुन्हा कामावर रुजू करून घेतले आहे.
पुढे पाहा, या संबंधित छायाचित्रे...