आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिया खान आत्महत्या; आदित्य पांचोलीच्या घरी सीबीआयची झडती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- अभिनेत्री जिया खान आत्महत्याप्रकरणी सीबीआयच्या पथकांनी बुधवारी अभिनेता आदित्य पांचोली व त्याचा मुलगा सूरज यांच्या घराची झडती घेतली. जून २०१३ रोजी राहत्या घरी जियाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले हाेते. मात्र, तिची आई राबिया यांनी जियाने आत्महत्या केली नसून तिची हत्या केल्याचा आरोप केला होता. तसेच त्यांनी याप्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून सीबीआय चौकशीची मागणी केली होती. जिया आणि सूरज पांचोली यांच्यात अनेक वर्षे प्रेमसंबंध होते. आत्महत्या करण्यापूर्वी जियाने सूरजला शेवटचा फोन केला होता. त्यानंतर सूरजला पोलिसांनी अटक केली होती.