आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनेत्री जिया खानप्रकरणी सूरज पांचोलीवर आरोपपत्र दाखल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अभिनेत्री जिया खान आत्महत्येप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) बुधवारी सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. यात अभिनेता अादित्य पांचाेलीचा मुलगा सूरजला आरोपी करण्यात आले असून ही आत्महत्या असल्याचे सीबीआयने म्हटले आहे.
गेल्या सुनावणीत सत्र न्यायालयाने जिया प्रकरणातील चौकशीच्या स्थितीबाबत िवचारणा केली होती. त्यानंतर सीबीआयने आरोपपत्र दाखल केले आहे. ३ जून २०१३ रोजी जियाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यावेळी तिच्या खोलीमध्ये सहा पानी पत्र आढळले होते. यात सूरजचा उल्लेख होता. जिया आणि सूरज यांच्यात प्रेमसंबंधही होते. राबिया खान यांनी आपली मुलगी जियाने आत्महत्या केली नसून तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप करून सीबीआय चौकशीची मागणी केली होती. त्यानंतर उच्च न्यायालयाने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे वर्ग केला.