आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जनतेचे भांडवल नसल्याने सेबीने जिलेटच्या व्यवहारावर घातली बंदी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - कंपन्यांमध्ये किमान 25 टक्के जनतेचे भांडवल अर्थात पब्लिक शेअरहोल्डिंग असणे गरजेचे आहे. परंतु पुरुषांच्या सौंदर्य प्रसाधनांचे उत्पादन करणा-या जिलेट इंडिया लिमिटेडने या नियमाचे उल्लंघन केल्याचे भांडवल बाजार नियंत्रक लक्षात आल्याने या कंपनीचे मतदान हक्क तसेच सर्व प्रकारचे कॉर्पोरेट लाभ गोठवण्याचे आदेश सेबीने दिले.


या कंपनीला शेअर बाजारात व्यवहार करण्यापासूनदेखील मनाई करण्यात आली आहे. जिलेटची अमेरिकेतील प्रवर्तक कंपनी प्रॉक्टर अ‍ॅँड गॅम्बल तसेच भारतीय प्रवर्तक पोद्दार ग्रुप यांच्याकडून मिळणारा लाभांशदेखील गोठवण्यात येणार आहे. प्रवर्तकांची कंपनीमधील भागधारणा जोपर्यंत 75 टक्क्यांपर्यंत जात नाही तोपर्यंत ‘सेबी’चे हे बंधन कायम राहील. सध्या प्रवर्तकांचे जिलेटमध्ये 88.76 टक्के भांडवल असून त्यापैकी 48 टक्के भांडवल गोठवण्यात आले आहे.