आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फेसबुकवर प्रेम: प्रेयसीने संबंध तोडले म्हणून प्रियकराने भोसकून केली हत्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आरोपी जितेंद्र - Divya Marathi
आरोपी जितेंद्र
मुंबई- प्रेम संबंध कायम ठेवण्याबाबत प्रेयसीने असमर्थता दाखविल्याने संतप्त झालेल्या 24 वर्षीय युवकाने एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीची हत्या केली आहे. यानंतर संबंधित युवकाने स्वत:वर चाकूने हल्ला करून आत्महत्येचा प्रयत्न केला. तो गंभीर जखमी असून त्याच्यावर रूग्णालयात उपचार सुरु आहेत. ही घटना मुंबईतील जोगेश्वरी भागात घडली आहे. धनश्री कुबल आणि विरार भागात राहणा-या जितेंद्र कुबल यांच्यात प्रेमसंबंध होते. दोघेही कोकणातील मालवण तालुक्यातील आहेत. दोघांची फेसबुकवरून मैत्री झाली व पुढे प्रेमसंबंधही...
जितेंद्र इंजिनियर आहे तर धनश्री दहावीत शिकत होती. धनश्री आणि जितेंद्र यांच्यात प्रेमसंबंध झाल्याचे धनश्रीच्या कुटुंबियांना लक्षात आले. त्यामुळे तिच्या घरच्यांनी जितेंद्रसोबतचे प्रेमसंबंध तोडून शिक्षणाकडे लक्ष देण्यास सांगितले. त्यानंतर धनश्रीने जितेंद्रशी संबंध तोडले. काही केल्या धनश्री त्याला भेटत नव्हती. अखेर शेवटचे भेटण्यासाठी व माझ्याकडे आपल्या दोघांचे असलेले फोटो घेऊन जाण्यासाठी ये असा आग्रह जितेंद्रने धनश्रीकडे केला. हाच आग्रह तिच्या जिवावर बेतला.
धनश्रीने घरच्यांना प्रेमसंबंधाची माहिती मिळाली आहे मला यापुढे तुला भेटता येणार नाही असे सांगत संतप्त झालेल्या जितेंद्रने धनश्रीला चाकूने भोकसले. धनश्रीवर आठ-दहा वार केले. त्याचवेळी त्याने स्वतावरही वार करून घेतले. त्यानंतर दोघांनाही रूग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान धनश्रीचा मृत्यू झाला. तर जितेंद्र गंभीर जखमी आहे.
पुढे स्लाईड्समध्ये पाहा, फोटोज...