आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jio Chat Is Similar To Other Chat Applications Like WhatsApp Latest

रिलायन्सचे Jio चॅट लावणार Whatsapp ची \'वाट\', 4Gत मिळणार अनोख्या सुविधा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सूचना- छायाचित्राचा वापर केवळ सादरीकरणाकरिता करण्यात आला आहे. - Divya Marathi
सूचना- छायाचित्राचा वापर केवळ सादरीकरणाकरिता करण्यात आला आहे.
मुंबई- रिलायन्स ग्रुप लवकरच भारतात 4 जी टेक्‍नोलॉजी लॉन्च करण्याच्या तयारीत आहेत. या वर्षाच्या अखेरीस भारतात 4 जी सेवा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असल्याचे मुकेश अंबानी यांनी म्हटले आहे. 4 जी आल्यानंतर कंपनीच्या मोबाईल चॅट अॅपला चालना मिळणार आहे. रिलायन्सच्या जियो चॅटमुळे वॉट्सअॅप, वी-चॅट, वायबर आणि हाईक यासारख्या अॅपची वाट लागणार आहे.
वॉट्सअॅपला काय आहे धोका- वॉट्सअॅपने मागील काही काळात अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. ज्याला लोकांनीही पसंती दिली. त्यात मग व्हाईस कॉलिंग असो की ब्लू टिक फीचर असो. मात्र, जियो चॅटमध्ये असलेल्या सुविधा (फीचर्स) वॉट्सअॅपची वाट लावू शकतात. वॉट्सअॅपने आतापर्यंत व्हिडिओ कॉलिंग, ऑडियो नोट, डूडल, स्टीकर, लोकेशेन आणि स्टेटस शेयर करण्याची सुविधा पुरवली नाहीये. ज्या सुविधा जियो चॅटमध्ये उपलब्ध आहे. 4 जी आल्यानंतर जियो चॅटला आमखी मजबूती मिळणार आहे.
फ्री आहे जियो चॅट-
वायफाय कनेक्शन अथवा मोबाईल डाटाद्वारे जियो चॅटचा वापर अगदी मोफत आहे. तर व्हॉटसअॅपला एक वर्षानंतर तुम्हाला रिन्यू करावे लागते. यासाठी तुम्हाला वार्षिक 56 रुपये भरावे लागतात. याची माहिती आपल्याला वॉट्सअॅपच्या पेमेंट इंफॉर्मेशनवर मिळते. रिन्यू न केल्यासर वॉट्सअॅप बंद होते तर रिलायन्स जियो संपूर्णपणे मोफत आहे. याच्यासाठी तुम्हाला काहीही मोबदला द्यावा लागणार नाही.
काय उत्तम सुविधा आहेत जियो चॅटमध्ये-
वॉट्सअॅपप्रमाणेच जियो चॅटवर सुद्धा मॅसेजिंग प्लॅटफॉर्म उपलब्ध असेल. जेथे यूजर्ससाठी ब्रॉडकास्‍ट यासारख्या सुविधांसह इंस्टंट मैसेजिंगची सुविधा उपलब्ध आहे. जियो चॅटद्वारे एका वेळी एक मॅसेज 100 जणांना पाठवला जाऊ शकतो.
पुढील स्लाईडसद्वारे जाणून घ्या कोणत्या कोणत्या सुविधा आहेत जियो चॅटमध्ये उपलब्ध आहेत...