आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छत्रपतींच्या घराण्याला बदनाम करण्याचे षडयंत्र; उदयनराजेंवरील आरोपावर जितेंद्र आव्हाडांचे ट्विट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करुन उदयनराजे यांचे समर्थन केले आहे. - Divya Marathi
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करुन उदयनराजे यांचे समर्थन केले आहे.
सातारा/मुंबई- 36 हजार एकर जमीन असणारे खासदार उदयनराजे दोन लाखांची खंडणी मागतील का, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी उपस्थित केला आहे.
 
साताऱ्यात 36 हजार एकर जमीन असणाऱ्या उदयनराजेंना 2 लाखांच्या खंडणीच्या गुन्ह्यात अटक म्हणजे छत्रपतींच्या घराण्याला बदनाम करण्याचे षडयंत्र असल्याचा आरोप आमदार जितेंद्र आव्हाडांनी ट्विटरवरुन केला आहे.
 
सातव यांनी केले रिट्वीट
आव्हाडांचे हेच ट्वीट रिट्वीट करुन त्यावर छत्रपतींना बदनाम करण्याचे कारस्थान महाराष्ट्र खपवून घेणार नाही, असे म्हणत काँग्रेसचे आमदार राजीव सातव यांनी त्यांना पाठिंबा दिला आहे.
 
काय आहे प्रकरण
लोणंद येथील सोना अलाईज कंपनीचे मालक राजकुमार जैन यांना खंडणीसाठी धमकावल्या प्रकरणी उदयनराजे भोसलेंवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साताऱ्यातील राष्ट्रवादीचे खासदार असलेले उदयन राजे यांना खंडणीच्या गुन्ह्यात अटक होण्याची शक्यता आहे. 
बातम्या आणखी आहेत...