आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jitendra Awhad In Maharshtra Cabinet Latest News In Marathi

आव्हाड, गावितांची मंत्रिपदी वर्णी! राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या फेरबदलात फौजिया खान यांना डच्चू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस मंत्रिमंडळात फेरबदल करण्याची शक्यता वर्तवली जात होती. त्यानुसार पक्षाचे कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड व शरद गावित यांना मंत्रिपद मिळणार हे जवळपास निश्चित आहे. गुरुवारी सकाळी राजभवनात दोघांचा शपथविधी होईल, असे राष्ट्रवादीच्या सूत्रांनी सांगितले. फेरबदलात राज्यमंत्री फौजिया खान यांना डच्चू देण्यात येणार आहे.
वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांची मुलगी हिना नंदुरबारमधून भाजपच्या तिकिटावर लोकसभेच्या मैदानात उतरल्याने गावित यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. हिना निवडून आल्या.
विजयकुमार गावितांच्या जागी आव्हाडांना संधी देण्यात येईल. शरद हे विजयकुमार गावितांचे सख्खे भाऊ असून नवापूर मतदारसंघातून ते समाजवादी पार्टीकडून निवडून आले आहेत. शरद यांच्या विजयात विजयकुमार यांचा मोठा वाटा होता. शरद हे सपाचे आमदार असले तरी ते कागदोपत्री आहेत. राष्ट्रवादीशीच त्यांचे सख्य आहे. फौजिया खान यांचे राज्यमंत्री पद गावित यांना देण्यात येईल. लोकसभा निवडणुकीत परभणीत पक्षाचे उमेदवार विजय भांबळे यांच्याविरोधात काम केल्याने पक्षाने फौजियांना नोटीस बजावली होती. तसेच फौजिया यांची विधान परिषद सदस्यत्वाची मुदतही संपत असल्याने तेथे नवीन चेहरा आणला जाणार होता.
सूर्यकांता पाटलांची संधी हुकली
फेरबदलात सूर्यकांता पाटलांना मंत्रिपद मिळण्याची चर्चा होती. मात्र शेवटच्या क्षणी पाटील यांच्याऐवजी आव्हाडांचे नाव पुढे आले. लोकसभेसाठी आघाडीच्या जागाबदलात हिंगोलीची जागा काँग्रेसला गेल्याने पाटील यांना निवडणूक लढवता आली नव्हती.
अमित देशमुख यांचेही नाव
काँग्रेसकडून फेरबदलाची चर्चाच सुरू आहे. रिक्त चार मंत्रिपदापैकी अमित देशमुख यांचे नाव निश्चित झाल्याचे सूत्रांकडून समजते. प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, कल्याण काळे, रोहिदास पाटील यांची नावे बुधवारी चर्चेत होती. मात्र अमित यांचेच नाव ठरले.