आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एलफिन्स्टन घटनेच्या निषेधार्थ आव्हाडांचा रेलरोको 2 मिनिटात आटोपला; एकही लोकल नाही थांबली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्त्वात चेंगराचेंगरीच्या घटनेच्या निषेधार्थ रेल रोको करण्यात आला. - Divya Marathi
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्त्वात चेंगराचेंगरीच्या घटनेच्या निषेधार्थ रेल रोको करण्यात आला.
मुंबई- एलफिन्स्टन दुर्घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसने केलेला रेलरोको अवघ्या दोन मिनिटात संपला, त्यामुळे प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला. सकाळी सव्वानऊच्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्त्वात हा रेल रोको करण्यात आला.
 
जितेंद्र आव्हाड सव्वा नऊच्या सुमारास कार्यकर्त्यांसह आंदोलनासाठी कळवा स्टेशनवर आले. मात्र आधीच तयारीत असलेल्या पोलिसांनी आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना अवघ्या दोन मिनिटात ताब्यात घेऊन बाजूला केले. त्यामुळे एकही लोकल थांबून राहिली नाही. शिवाय लोकांचा खोळंबाही झाला नाही. आव्हाडांनी रेलरोको करुन लोकांना त्रास देऊ नये, अशी भावना सोशल मीडियावर आणि रेल्वे सुरक्षा संघानेही व्यक्त केली होती.
 
पुढील स्लाईडवर पाहा फोटो आणि माहिती
बातम्या आणखी आहेत...