Home »Maharashtra »Mumbai» Jitendra Joshi Play Sant Tukaram Maharaj

जितेंद्र जोशी साकारणार ‘संत तुकाराम महाराज’

प्रतिनिधी | Mar 01, 2012, 00:58 AM IST

  • जितेंद्र जोशी साकारणार ‘संत तुकाराम महाराज’

मुंबई - आकाशाएवढ्या तुकोबांच्या व्यक्तिमत्त्वाची भुरळ 400 वर्षांनंतरही पडते आणि संतवृत्तीच्या तुकारामांचा शोध घेण्याचा प्रयत्न अनेक विद्वान करत असतात. 75 वर्षांपूर्वी ‘संत तुकाराम’ चित्रपटाने मिळवलेल्या लोकप्रियतेच्या आठवणी आजही येतात. आता 21व्या शतकातही हाच ‘तुकाराम’ कसा घडला याचा मागोवा घेणारा चित्रपट दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी घेऊन
येत आहेत.
‘तुकारामाला संतपण समाजाने नंतर बहाल केले, मात्र बाल्यावस्थेपासून संतपदापर्यंत एक माणूस म्हणून तुकारामांची झालेली जडणघडण या विषयावर अनेकांनी विपुल लेखन करून ठेवले आहे. या लेखनाच्या आधारे कविमनाचा, हळवा आणि संतपदाला पोहोचण्यापूर्वी घडत असलेला तुकाराम दाखवण्यासाठीच आम्ही ‘तुकाराम’ 21व्या शतकात आणला,’ असे दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी सांगितले. ‘संत तुकाराम’ चित्रपटात संतपदाला पोहोचल्यानंतरच्या घटना त्या अनुषंगाने आलेल्या दंतकथा साकारण्यात आल्या आहेत. त्या चित्रपटाचे यश निश्चितच अतुल्य आहे. मात्र आपण चित्रपटात वयाच्या प्रत्येक टप्प्यावर घडत गेलेला तुकाराम दाखवणार असल्याचेही कुलकर्णी यांनी सांगितले. ‘तुकाराम’ या चित्रपटात अभिनेता जितेंद्र जोशी याने मध्यवर्ती भूमिका साकारली आहे. या सिनेमात तुकारामांच्या अभंगांचा समावेश करून नऊ गाणी आहेत. अवधूत गुप्ते आणि अशोक पत्की यांनी संगीताची धुरा सांभाळली. राधिका आपटे, वीणा जामकर, शरद पोंक्षे, प्रतीक्षा लोणकर, यतिन कार्येकर हे कलाकार या चित्रपटात आहेत.

Next Article

Recommended