आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jiya Khan Murder Case, Suraj Pancholi Charged With Abetting Jiah Khan\'s Suicide

जिया खान खूनप्रकरणी सूरज पांचोली प्रमुख आरोपी, कोर्टात आरोपपत्र दाखल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- अभिनेत्री जिया खान हिच्या आत्महत्याप्रकरणी तिचा प्रियकर व आदित्य पांचोलीचा मुलगा सूरज याच्याविरोधात मुंबई पोलिसांनी आज कोर्टात आरोपपत्र दाखल केले. सूरज याच्याविरोधात मुंबई पोलिसांनी भक्कम पुरावे गोळा करताना 22 साक्षीदारांची साक्ष घेतली आहे. त्या आधारावरच पोलिसांनी सुमारे 500 पानांचे आरोपपत्र बनवून कोर्टात दाखल केले आहे. याप्रकरणी पोलिसांनी आत्महत्या अशी नोंद केली होती. मात्र, जिया खानच्या आईने सूरजवर गंभीर आरोप करीत त्याच्याविरोधात कोर्टात पुरावे सादर केले होते.
त्यानंतर कोर्टाने मुंबई पोलिसांना जियाच्या मृत्यूप्रकरणी पुन्हा नव्याने चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर पोलिसांनी जियाच्या आईने उपस्थित केलेले प्रश्न लक्षात घेऊन चौकशी करीत सूरजविरोधात गुन्हा दाखल केला होता. जियाला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली अटक केली होती. मात्र त्यानंतर सूरजला जामिनावर सोडण्यात आले होते. या आरोपपत्रात सूरजला प्रमुख आरोपी बनविण्यात आले आहे.