आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जामिनासाठी सूरजची उच्च न्यायालयात धाव

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - अभिनेत्री जिया खानच्या आत्महत्येप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेला तिचा प्रियकर सूरज पांचोलीने जामिनासाठी बुधवारी उच्च न्यायालयात धाव घेतली. त्याच्या अर्जावर 5 जुलै रोजी सुनावणी होण्याची शक्यता आहे.
गेल्या आठवड्यात सत्र न्यायालयाने सूरजचा जामीन अर्ज फेटाळला होता. मृत्यूपूर्वी जियाने पत्र लिहिले होते. चार दिवसांनंतर तिची आई रबिया खान यांनी ते पत्र पोलिसांकडे सुपूर्द केले. सूरजने आपला मानसिक छळ करण्याबरोबरच गर्भपात करण्यास भाग पाडल्याचे जियाने पत्रात नमूद केले होते. त्यामुळे आत्महत्येला सूरजच कारणीभूत असल्याचा दावा पोलिसांनी केला होता. त्याच पत्राच्या आधारे सूरजला अटक करण्यात आली. जियाशी असलेल्या संबंधांची कबुली त्याने दिली असली तरी आपल्याला अडकवण्यासाठी तिची आई राबिया यांनी या पत्राचा दुरुपयोग केल्याचे त्याने जामीन अर्जात म्हटले आहे. सकृत्दर्शनी जियाच्या मानसिक छळाला सूरजच जबाबदार असल्याचे मत नोंदवत सत्र न्यायालयाने त्याला जामीन नामंजूर केला होता.