आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • JJ Hospital Dean Dr. Tatyarao Lahane Latest News In Marathi

डॉ. तात्याराव लहाने पाच दिवस ‘बेघर’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - जे. जे. शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांना 25 फेब्रुवारीपर्यंत रुग्णालयाच्या आवारात प्रवेश करण्यास मुंबई सत्र न्यायालयाने गुरुवारी मनाई केली. डॉ. लहाने यांचे शासकीय निवासस्थान रुग्णालयाच्या आवारातच आहे. याच आवारात या प्रकरणातील साक्षीदार असलेले आठ सफाई कर्मचारी राहतात. त्यांच्यावर दबाव येऊ नये म्हणून न्यायालयाने लहाने यांना प्रतिबंध केला आहे.
डॉ. लहाने यांच्यावर रुग्णालयातील एका कर्मचार्‍याला शिवीगाळ केल्याच्या आरोपावरून ‘अ‍ॅट्रॉसिटी’ कायद्यान्वये गुन्हा नोंद झाला आहे. याप्रकरणातील साक्षीदारांवर दबाव टाकू नये म्हणून न्यायालयाने डॉ. लहाने यांना रुग्णालयाच्या आवारात प्रवेश करण्यास प्रतिबंध केला आहे. सफाई कामगार नरेश वाघेला याने डॉ. लहाने यांच्याविरोधात तक्रार दिली होती. या कायद्याअंतर्गत डॉ. लहाने यांना केव्हाही अटक होऊ शकते. अटक टाळण्यासाठी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात गेल होते; परंतु उच्च न्यायालयाने त्यांना सत्र न्यायालयात अर्ज करण्यास सांगितले. त्यानुसार गुरुवारी लहाने यांनी सत्र न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल केला. त्यावर जामीन अर्जावरील सुनावणी पूर्ण होईपर्यंत म्हणजेच 25 फेब्रुवारीपर्यंत लहाने यांना अटक करू नये, असे आदेश देतानाच त्यांना रुग्णालयाच्या आवारात प्रवेश करू नये, असे बजावले आहे. त्यामुळे डॉ. लहाने यांना आणखी पाच दिवस मात्र, घराबाहेर काढावे लागणार आहेत.
डॉ. लहाने यांच्यावर ज्या वादात अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा नोंद झाला, त्या जे. जे. शासकीय रुग्णालयातील बदली कर्मचार्‍यांचा संप अद्याप मिटलेला नाही.