आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इनामी जमिनीतून चालते व्हा; ‘पीपल्स रिपब्लिकन’चे नेते कवाडे यांचा इशारा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- राज्यातील हजारो हेक्टर इनामी (महार वतनी) जमिनी राजकारणी, शिक्षणसम्राट आणि धनदांडग्यांनी बळकावल्या असून त्या परत मिळवण्यासाठी पीपल्स रिपब्लिकन पार्टी राज्यव्यापी आंदोलन छेडणार असल्याची माहिती पार्टी अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली.
अमरावती येथे कवाडे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी भूमी हक्क परिषदेचे आयोजन केले आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील हजारो भूमिहीन या परिषदेत सहभागी होणार आहेत. गायरान जमिनीवर अतिक्रमण केलेल्या भूमिहीनांना जमीनपट्ट्याची मालकी देण्याचा निर्णय 1991 मध्ये राज्य शासनाने घेतला होता. मात्र, त्या निर्णयाची अद्याप अंमलबजावणी झाली नसल्याचा आरोप कवाडे यांनी केला. राज्यात हजारो हेक्टर जमीन महार वतनाची आहे; परंतु धनदांडग्यांनी त्या बळकावल्या असून इनामी जमिनी परत घेण्यासाठी ते आंदोलन करणार आहेत.