आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jogendra Kawade News In Marathi, PRP, Congress, Lok Sabha Election

निवडणुकीचा आखाडा: ‘पीआरपी’ने काँग्रेसला ‘कवाडे’ उघडली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - ‘काँग्रेस जळते घर असल्याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते. पण, तो आता इतिहास झाला आहे. लोकसभा निवडणुकीत जातीयवादी शक्तींना रोखण्यासाठी पीपल्स रिपब्लिकन पक्ष (पीआरपी) एकाही जागेची अपेक्षा न ठेवता काँग्रेसशी आघाडी करत आहे,’ अशी घोषणा पक्षाध्यक्ष प्रा. जागेंद्र कवाडे यांनी बुधवारी केली. ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेचे माजी आमदार योगेश पाटील यांनीही या वेळी कॉँग्रेस पक्षात प्रवेश केला.


काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात दोन्ही पक्षांच्या नेत्यांची बुधवारी संयुक्त पत्रकार परिषद झाली. त्यास मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, उद्योगमंत्री नारायण राणे, खासदार हुसेन दलवाई, मुंबई अध्यक्ष गजानन चांदूरकर आणि काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत हजर होते.


‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर निजामाचे हस्तक होते, असा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सांगलीच्या सभेत आरोप केला होता. ‘घरात नाही पीठ पण मागतंय विद्यापीठ, या शब्दात त्यांनी विद्यापीठ नामांतर आंदोलनाची संभावना केली होती. अशा जातीयवादी शिवसेनेशी रामदास आठवले कसे युती करतात?’, असा सवाल
प्रा. कवाडे यांनी विचारला.
‘अ‍ॅड. आंबेडकरांची आघाडी युतीच्या पथ्यावर’
अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर काँग्रेससोबत हवे होेते. मात्र, त्यांनी महाराष्‍ट्र लोकशाही आघाडीची स्थापना केली. हा उपद्व्याप शिवसेना-भाजपच्या पथ्यावर पडणार आहे. लोकसभेसाठी दोन जागा द्याव्यात अशी आमची मागणी होती. मात्र सर्व उमेदवारांची घोषणा केली असल्यामुळे आता जागा सोडणे शक्य नाही, असे काँग़्रेसने सांगितल्यामुळे आम्ही एकाही जागेची अपेक्षा न ठेवता कॉँग्रेसशी आघाडी केली असल्याचे कवाडे यांनी स्पष्ट केले.
कुंभारेही काँग्रेससोबत
बहुजन रिपब्लिकन एकता मंचच्या नेत्या आणि माजी मंत्री सुलेखा कुंभारे यांनीही काँग्रेसला पाठिंबा जाहीर केला. रिपाइं डेमोक्रॅटिक पक्षाचे (कांबळे गट) नेते समाधान नावकर यांनी काँग्रेसला पाठिंबा दिला आहे.