आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

या आहेत मुंबईतील लेडी फायर फायटर्स, ट्रेनिंग असे कठिण की थरथर कापू लागले पाय!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- ‘शौर्य, त्याग, आत्मसंयम’ हे मुंबई फायर ब्रिगेडचे घोषवाक्य. या दलात एकाच वेळी भरती होत जिद्दीच्या जोरावर ९७ तरुणींनी हे तिन्ही आदर्श घालून दिले आहेत. फायर फायटर्स म्हणून जूनपासून या तरुणींचे प्रशिक्षण सुरू असून नोव्हेंबरअखेर ते पूर्ण करत डिसेंबरमध्ये त्या दलात दाखल होतील. या सर्व महिला फायर फायटर्स अँटॉपहिल भागात असलेल्या विभागीय कार्यालयात १८३ दिवसांपासून रोज ८ तास कठोर प्रशिक्षण घेत आहेत. यात कधी ४६ फूट उंचीपर्यंत चढावे लागते तर कधी कोपराच्या साह्याने मातीवर सरपटत जावे लागते. कधी कधी तर २० फुटांवरून उडीही मारावी लागते. हे सर्व कसब या तरुणींनी यशस्वीपणे िमळवले आहे.


मुंबई अग्निशामक दलाच्या १३० वर्षांच्या इितहासात प्रथमच एवढ्या माेठ्या संख्येने महिला दाखल होत आहेत. यापूर्वी एका वेळी ७ पेक्षा अधिक महिला भरती झालेल्या नाहीत. येथील ३४ अग्निशामक केंद्रांवर तैनात सुमारे १,८०३ अधिकारी-कर्मचाऱ्यांत महिलांची संख्या केवळ १६ आहे. या ९७ जणींना फायर फायटर वर्षा वसंतराव बुधवंत प्रशिक्षण देत आहेत. 

 

प्रशिक्षक वर्षा म्हणते, अडचणी येतातच, विजयाचा विश्वास होता
महिला फायर फायटर्सना प्रशिक्षण देणाऱ्या वर्षा बुधवंत म्हणाल्या, फक्त पुरुष फायटरच का, असा प्रश्न पडायचा. म्हणूनच २०१२ मध्ये या दलात सामील झाले. अनेक बचावकार्यात सहभागी झाले. अनेक लोकांचे प्राण वाचवले.आता या क्षेत्रात येणाऱ्या नव्या तरुणींना प्रशिक्षण देत आहे. प्रारंभी तरुणींना प्रशिक्षणात अनेक अडचणी येत होत्या. मात्र, यावर सर्वांनीच जिद्दीने मात केली. 

 

कविता म्हणते... ४६ फूट उंचीवर पाठीवर लादून बचावकार्य 
पहिल्या महिला फायर फायटर ब्रिगेडच्या कविता बुरकुले म्हणाल्या, प्रशिक्षणादरम्यान बचावकार्यात एका मुलीस दुसऱ्या मजल्यावरून पाठीवर आणावयाचे होते. अगोदर भीती वाटली. मी त्या मुलीस पाठीवर घेऊन खाली येऊ लागले तेव्हा ती उंची पाहून चक्कर आल्यासारखे झाले. मात्र, मी धैर्य सोडले नाही. जिद्दीने कठोर प्रशिक्षण पूर्ण केले. खरं सांगते, प्रशिक्षण कठीणच असते. 

 

दीपाली म्हणते, जीव तोडून आजवर प्रशिक्षण पूर्ण केले
दीपाली विजय भोजने यांनी सांगितले, अग्निशामक दलाच्या प्रशिक्षणात मुलगा-मुलगी असा भेद नसतो. प्रशिक्षणाचा प्रारंभ धावण्याच्या सरावाने होतो. यानंतर रोज व्यायाम आणि शेवटच्या टप्प्यात बचावकार्य कसे करायचे, याचे प्रात्यक्षिक करून दाखवावे लागते. ५०-६० किलोच्या मुली पाठीवर घेऊन ४६ फूट उंचीवरून खाली यावे लागते. मात्र, हे प्रशिक्षण मी जीव तोडून पूर्ण केले. 

 

ऑक्सिजन सिलिंडर घेऊन दाट धुरात बचावकार्य
घरात आग लागली, दाट धूर झाला तर बचावकार्य कसे करायचे, हे यात शिकवले जाते. मुलींच्या डोक्यावर हेल्मेट आणि तोंडावर मास्क तसेच पाठीवर ऑक्सिजनचे सिलिंडर असते. खोलीत सुमारे ५० मीटर आत जाऊन बचावकार्य करत ऑपरेशन पूर्ण करून परतावे लागते.

 

महिला-पुरुषांसाठी असते एकाच प्रकारचे प्रशिक्षण
७८९ फायर फायटर जागांसाठी सुमारे १ लाख अर्ज होते. यात निवड करताना पुरुष व महिलांच्या समान चाचण्या झाल्या. दोघांनाही विशिष्ट उंचीवरून उडी मारावी लागे. सोबत धावणे व व्यायाम वेगळाच. प्रशिक्षणात दोघांनाही ५० किलो प्रातिनिधिक ओझे घेऊन पळावे लागे. 

 

पुढे स्लाई़डद्वारे पाहा, या लेडी फायर फायटर्स ट्रेनिंगचे फोटोज...

बातम्या आणखी आहेत...