आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुस्लिम बांधवानों, मोदीसाठी नव्हे आरोग्यासाठी योगा करा-अब्बास बोहरा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- योगा हा एक व्यायाम आहे. त्याला कोणत्याही धर्माशी जोडू नये. योगाकडे व्यायामाचा प्रकार म्हणून पाहावे. त्यात राजकारण आणू नये. त्यामुळे माझ्या मुस्लिम बांधवानो, इतरांसाठी नाही तर आपल्या आरोग्यासाठी योगा करा असा सल्ला बोहरी समाजाचे नेते अब्बास अली बोहरा यांनी दिला आहे.
योग दिन हा भाजप किंवा मोदींचा कार्यक्रम नाही तो देशाचा कार्यक्रम आहे. जे लोक सोनिया नमस्कार करतात त्यांनी सूर्य नमस्कारावरून वाद घालू नये असे सांगत काही मुस्लिम संघटनांनाही त्यांनी लक्ष्य केले आहे. दरम्यान, दारूल उलूम या संस्थेपाठोपाठ आता बोहरा समाजानेही योगाला पाठिंबा दिला आहे.
बोहरी समाजात मानाचे स्थान असलेल्या अब्बास अली बोहरी यांनी यावेळी योग दिनाला आपला पाठिंबा असल्याचे जाहीर केले. बोहरी महणाले, योगाला कोणत्याही धर्माशी जोडणे चुकीचे आहे. यावरून राजकारण करू नये. योगामुळे आरोग्य उत्तम राहते. त्यामुळे मुस्लिम बांधवांना माझी विनंती आहे की, त्यांनी याबाबत कोणताही वाद वाढवू नये. योगा दिवस भारताच्या पुढाकाराने सुरु झाला आहे. त्यामुळे आपला देश याचे नेतृत्त्व करीत आहे. अशावेळी आपण सर्वांनी एकत्र आले पाहिजे. एकत्र येण्यासाठी योगा हा एक मार्ग आहे. योगाच्या नावावर हिंदू-मुस्लिम असा वाद घालणे निरर्थक आहे. त्यामुळे मुस्लिम संघटनांनी योगाविरोधात कोणताही फतवा जारी करू नये, असे आवाहनही बोहरा यांनी केले आहे.
बातम्या आणखी आहेत...