आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई इंडियन्सचा कोच जॉन्टी रोड्सचा \'इंडिया\'साठी हिंदू शास्त्रानूसार पूजापाठ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई इंडियन्स टीमचा फिल्डींग कोच जॉन्टी -होडसने आपल्या इंडिया या मुलीसाठी हिंदु शास्त्र व परंपरेनुसार पूजापाठ केला. - Divya Marathi
मुंबई इंडियन्स टीमचा फिल्डींग कोच जॉन्टी -होडसने आपल्या इंडिया या मुलीसाठी हिंदु शास्त्र व परंपरेनुसार पूजापाठ केला.
मुंबई- दक्षिण अफ्रिकेचा माजी फलंदाज आणि आयपीएलमधील मुंबई इंडियन्स टीमचा फिल्डींग कोच जॉन्टी -होडसने आपले इंडिया या मुलीसाठी हिंदु शास्त्र व परंपरेनुसार पूजापाठ केला. मुंबईतील सांताक्रूझ येथील पेजावर मठात शनिवारी हा कार्यक्रम पार पडला.
दक्षिण अफ्रिकेचा जबरदस्त क्षेत्ररक्षक राहिलेला जॉन्टी -होडस गेली 9 वर्षे मुंबई इंडियन्स संघासोबत जोडला गेला आहे. त्यामुळे भारत खासकरून मुंबई शहर हे त्याचे दुसरे घर झाले आहे. वर्षातील तीन-चार महिने तो भारतात घालवतो. गेल्या वर्षी जॉन्टीला एक कन्यारत्न प्राप्त झाले होते. जॉन्टीच्या पत्नीने या मुलीला भारतात जन्म दिला होता. त्यामुळे जॉन्टीने तिचे नाव इंडिया असे ठेवले आहे. नुकताच तिचा पहिला वाढदिवस (22 एप्रिल) साजरा केला. यानिमित्ताने जॉन्टीने कुटुंबियांसमवेत तामिळनाडूला भेट दिली व तेथील एका मंदिरात दर्शन घेतले.
आता मुंबईतील सांताक्रूझमधील पेजावर मठात इंडियाच्या भविष्यासाठी व तिच्या यशासाठी होमहवन करीत प्रार्थना केली. या पूजेसाठी त्याने भारतीय परंपरेतील धोतर परिधान केले होते. आपल्याला भारत देश खूप आवडतो. येथील संस्कृती, परंपरा, भौगोलिक व जैविक विविधता व आधुनिकता अशा सर्वांचा मिलाप आहे. त्यामुळे येथील लोकांचे बॅलन्सड जीवन मला भावते असे जॉन्टीने एका मुलाखतीत सांगितले होते.
पुढे वाचा व छायाचित्रातून जॉन्टी -होडसने आपल्या मुलीसाठी कसा केला पूजापाठ...
बातम्या आणखी आहेत...