मुंबई - पत्रकार रविकिरण देशमुख यांची मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे माध्यम सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली. फडणवीस यांनीच ही माहिती दिली. रविकिरण देशमुख हे मूळचे लातूरचे आहेत. पीएमओच्या धर्तीवर सीएमओची स्थापना करणा-या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना जसे ‘मीडिया अॅडव्हायजर’ असतात अगदी तशाच पद्धतीने स्वतःसाठीही नियुक्ती केली आहे. यापूर्वी पृथ्वीराज चव्हाण यांनी निवडणुकीच्या काळात प्रख्यात पत्रकार अंबरीश दिवानजी यांची नियुक्ती केली होती; परंतु ती सरकारी नियुक्ती नव्हती.