आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ISIS मध्ये सहभागी व्हायला निघालेल्या नवी मुंबईतील पत्रकाराला दिल्लीत अटक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- आपल्या दहशतीने व क्रूर पद्धतीमुळे हत्या घडवून आणणा-या आयसिस या दहशतवादी संघटनेत सामील होण्यास उत्सुक असलेल्या नवी मुंबईतील एका पत्रकाराला काल रात्री नवी दिल्ली पोलिसांनी अटक केली. जुबेर अहमद खान असे त्याचे नाव असून, तो एका उर्दू पेपरचा पत्रकार आहे. इराकला जाण्यासाठी व्हिसा मिळवण्यासाठी तो दिल्लीला गेला होता. तेथेच पोलिसांनी त्याला अटक केली.
जुबेरला आयसिसचे प्रवक्ता व्हायचे होते. यासाठी जुबेर खानने सोशल मीडियावरून आयसिसचा नेता अबू बक्र अल-बगदादीला मेसेज केला होता. जुबेरने बगदादीकडे आयसीसचा अधिकृत प्रवक्ता बनण्याची इच्छा बोलून दाखवली होती. त्यानंतर त्याने नवी दिल्लीतील भारतातील इराक दूतावासाशी संपर्क साधला तसेच व्हिसाची मागणी केली. गुरुवारी तो दिल्लीतील वसंत विहारमधल्या इराकी दूतावासात झुबेर व्हिसा घ्यायला गेला. तेथे तो आयसिसबाबत माहिती विचारत होता. त्यामुळे इराकी दूतावासातील अधिका-यांनी याची माहिती दिल्ली पोलिसांना तत्काळ दिली. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी त्याला दूतावासातून ताब्यात घेतले.

याच पत्रकाराने याकूबला ठरवले होते शहीद-
मार्च 1993 मध्ये मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटप्रकरणात दोषी आढळलेल्या व नुकतीच फाशी देण्यात आलेल्या याकूब मेमनला झुबेर अहमद खानने त्याला 'शहीद' झाला असे म्हटले होते. याकूब मेमनला 30 जुलै रोजी नागपूरात फाशी देण्यात आल्यानंतर त्याला दु:ख झाले होते. फाशीच्या दुस-या दिवशी म्हणजेच 1 ऑगस्ट रोजी झुबेर खाने सोशल मिडियात एक पोस्ट टाकून याकूबला शहीद संबोधत या फाशीचा निषेध व्यक्त केला होता.
याकूबच्या फाशीचा बदला घेण्यासाठी भारत सोडून आयसिसमध्ये जायची इच्छा त्याने त्यावेळी व्यक्त केली होती. लवकरच मी दिल्लीला जाईन आणि इराक दूतावासातून व्हिसा घेऊन इराकला जाईन असेही त्याने म्हटले होते. त्यानंतर काही नेटिझन्सनी याबाबत पोलिसांत तक्रार केली होती. तेव्हापासून झुबेर पसार झाला होता. याबाबत मुंबई पोलिसांच्या सूचनेनंतर दिल्ली पोलिसांनी इराक दूतावासाला त्याच्याबाबत विचारणा केली होती. अखेर गुरुवारी सायंकाळी तो इराकी दूतावासात जाताच अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार दिल्ली पोलिसांनी त्याला अटक केली. दरम्यान, आयसिसमध्ये सहभागी होणार असल्याचे जाहीर सांगणा-या झुबेर खानची मानसशास्त्रीय तपासणी करण्यात येणार आहे.
पुढे वाचा, झुबेर खानने याकूबच्या फाशीनंतर केलेली वादग्रस्त पोस्ट....
बातम्या आणखी आहेत...