आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जीपीएसने काढला मुंबईतील सामुहि‍क बलात्काराच्या आरोप्याचा माग!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - गँगरेप प्रकरणातील पाचवा आरोपी मोहंमद सलीम अन्सारी गुन्हय़ाच्या दिवशी राज्याबाहेर पळाला होता. मात्र, मुंबई पोलिसांनी जीपीएस तंत्राने अन्सारीचा माग काढून त्याच्या दिल्लीत जाऊन मुसक्या आवळल्या.

छायाचित्रकार तरुणी आणि तिच्या सहकार्‍याला मिलमध्ये जाण्याचा रस्ता त्यानेच दाखवला. तरुणीला ‘आपको हमारे शेठ के पास चलना होगा!’ असे दटावणारा अन्सारीच होता. गुन्हा घडला त्याच दिवशी रात्री सर्व आरोपी पसार झाले. अन्सारी मात्र चेंबूर येथील घरी गेला. आपण केलेला गुन्हा टीव्हीवर पाहिल्यानंतर त्याने दिल्लीला जाणारी रेल्वे पकडली. मोबाइलमधील सिमकार्ड फेकून दिले. मात्र, जुन्या मोबाइलमध्ये नवे सिम टाकले. दुसर्‍या दिवशी विजय जाधव हा पोलिसांच्या हाती लागला. त्याच्या मोबाइलमध्ये अन्सारीचा काढून टाकलेल्या सिमचा कॉल सेव्ह होता. त्यावरून पोलिसांना अन्सारीचा मोबाइल क्रमांक मिळाला. त्यावरून ‘जीपीएस’द्वारे माग काढण्यास सुरुवात केली. टिळक टर्मिनस (कुर्ला) येथून ईशान्य दिल्लीतील भारती नगर परिसरात तो गेल्याचे निष्पन्न झाले. पोलिस दिल्लीत दाखल झाले. पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या अन्सारीच्या मुसक्या नातेवाइकांच्या घरीच आवळण्यात आल्या. अशा प्रकारे या खटल्यातील पाचवा आरोपी जेरबंद झाला. दरम्यान, अन्सारीचे लग्न झालेले आहे. त्याला दोन मुले असून तो चेंबूरमध्ये राहतो.