आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Judicial Custody Of Bhujbal, Nephew Extended Till 11 May

भुजबळांच्या कोठडीत 11 मेपर्यंत वाढ, मुलगा पंकजविरोधात अजामीनपत्र वॉरंट जारी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मनी लाँडरिंग प्रकरणात सध्या तुरुंगात असलेले माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ आणि त्यांचे पुतणे समीर भुजबळ यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे. या दोघा काका-पुतण्याच्या न्यायालयीन कोठडीत 11 मेपर्यंत वाढ करण्यात आली आहे. दुसरीकडे, पैशांची अफरातफर केल्याप्रकरणी छगन भुजबळ यांचे चिरंजीव आणि आमदार पंकज भुजबळ यांच्याविरोधात ईडीने आज अजामीनपात्र वॉरंट काढले आहे.
गेली काही महिने तुरुंगात असलेले समीर भुजबळ आणि छगन भुजबळ यांची न्यायालयीन कोठडी आज संपत होती. त्यामुळे या दोघांना आज ईडीच्या विशेष कोर्टात हजर करण्यात आले. यानंतर कोर्टाने या दोघांच्या कोठडीत वाढ करीत 11 मे पर्यंत कोठडी वाढवली.
ईडीच्या अधिका-यांनी यावेळी छगन भुजबळ, समीर भुजबळ यांच्यासोबतच पंकज भुजबळ यांच्यावर मनी लाँडरिंग प्रकरणात सहभाग असल्याचा दावा केला. यानंतर कोर्टाने पंकज भुजबळांविरोधातही अजामीनपत्र वॉरंट जारी केले. दरम्यान, पंकज यांच्याविरोधातही अजामीनपत्र वॉरंट काढल्याने ईडीचे अधिकारी आता त्यांना कधीही ताब्यात घेऊ शकतात, अटक करू शकतात असे बोलले जात आहे. त्यामुळे छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांच्या पाठोपाठ पंकज भुजबळही लवकरच तुरुंगात दिसतील असे बोलले जात आहे.
समीर भुजबळ यांना फेब्रुवारीत अटक करण्यात आली तर छगन भुजबळ यांना मार्च महिन्यात अटक करण्यात आली आहे. या दोघांना मुंबईतील आर्थर रोड तुरुंगात ठेवण्यात आले आहे.