आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : दहा वर्षांपूर्वीच्‍या जखमा अजूनही ‘ओल्‍याच’; मुंबई थांबली होती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रस्‍त्‍यात साचलेल्‍या पावसामुळे पायी चालणेही अवघड झाले होते - Divya Marathi
रस्‍त्‍यात साचलेल्‍या पावसामुळे पायी चालणेही अवघड झाले होते
मुंबई – थोडासा पाऊस पडला की मुंबईतील रस्‍त्‍यांवर पाणी साचणे काही नवीन नाही. पण, तो दिवसच वेगळा होता. त्‍या दिवशीच पावसानेच नव्‍हे तर काळानेही डाव साधला. रोज धावणारे हे शहर अचानक थांबले. एरवी आरतुने वाट पाहायला लावणा-या वरुणराजाची तर भीती वाटत होती. होय, आम्ही आठवण करून देतोय ती २६ जुलै २००५ या दिवसाचीच. या प्रलयकारी दिवसाला आज (रविवार) 10 वर्ष पूर्ण झालीत. या प्रलयात तब्बल १ हजार ४९३ जणांचे बळी गेले आणि ४५० कोटींचे नुकसान झाले. त्यानंतर मिठीच्या मगरमिठीतून बाहेर पडण्यासाठी आजवर सुमारे २५०० कोटी खर्च झाले आहेत. तरी आजही मुंबईत पाणी तुंबत आहे. याचा त्रास मुंबईकरांना सहन करावा लागत आहे. त्‍यामुळे मुंबईकरांच्‍या जखमा अजूनही ओल्‍याच आहेत.
पुढील स्‍लाइडवर वाचा का डुंबून जाते मुंबई पाण्‍याखाली....