आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jummu Kashmir Shikh Murder Case Bye Lat Abu Jundal Comment On Police

शिख हत्याकांडात लष्कर-ए-तोयबाचा हात; जबिउद्दीनचा धक्कादायक गौप्यस्फोट

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई: दिल्लीत अटक करण्यात आलेला मुंबईतील 26/11 च्या हल्ल्यातील मास्टर माईंड दहशतवादी अबू अन्सारी उर्फ जबीउद्दीन एका मागून एक धक्कादायक गौप्यस्फोट करत आहे. जम्मू काश्मीरच्या छत्तीसिंहपुरा गावातील शिख हत्याकांड लष्कर-ए-तोयबाने घडवल्य़ाचाही गौप्यस्फोट त्याने केला आहे. या हत्याकांडामागे भारतीय लष्कराची प्रतिमा मलीन करण्‍याचा दहशतवाद्यांचा कट होता, असा दावाही जबीउद्दीन याने केला आहे.
मार्च 2000 मध्ये हे हत्याकांड घडवण्यात आले होते. या हत्याकांडात 35 शिख बांधवांचा मृत्यू झाला होता. हे हत्याकांड भारतीय लष्कराने घडवून आणल्याचा आरोप करण्यात आला होता. परंतु जबीउद्दीनच्या या गौप्य़स्फोटामुळे भारतीय लष्कर निष्कलंक असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मोस्ट वॉन्टेड दहशतवादी अबू हमजाचा 2010 पूर्वीच मृत्यू झाल्याचा खळबळजनक दावा अबू जिंदाल याने यापूर्वी केला होता. अबू हमजा देशातल्या अनेक अतिरेकी हल्ल्यांचा सूत्रधार होता. बंगळूरुच्या इंडियन इंन्स्टिट्यूट ऑफ सायन्सवर हल्ला अबू जिंदाल यानेच घ़डवून आणला होता, असेही त्याने पोलिसांना सांगितले.
भारताला हवा असलेला अबू हमजा जिवंत नाहीः जबिउद्दीनचा खुलासा
अबू जुंदलचा साथीदार फसीहला सौदी अरबमध्‍ये अटक
9/11 सारख्या हल्ल्याच्या तयारीत होता अबू हमजा