आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई- गेल्या बुधवारी अमिताभ बच्चन यांना जणू लॉटरीच लागली. एकाच झटक्यात त्यांना 41 कोटी रुपयांचा फायदा झाला. जस्ट डायलचा आयपीओ उघडल्याने ही जादू झाली होती. दोन वर्षांपूर्वी अमिताभ यांनी या कंपनीचे 6.28 लाख शेअर्स 10 रुपये भावाने खरेदी केले होते. 24 तासांतच भाव 661 रुपयांवर गेला. थोडक्यात 6600 पट नफा.
अमिताभ यांच्याकडे तर कंपनीचे फक्त 0.1 टक्के शेअर्स होते. जस्ट डायलचे संस्थापक व्ही. एस. एस. मणी यांची संपत्ती आयपीओ उघडल्यानंतर 1328 कोटी रुपये झाली. 16 वर्षांपूर्वी त्यांच्याकडे एक फोन घेण्यासाठी 15 हजार रुपयेही नव्हते. तेव्हा ते युनायटेड डाटाबेस या अमेरिकी कंपनीत डाटा एंट्री ऑपरेटर होते. तेव्हा त्यांना भारतातही यलो पेजेस टेलिफोनवर देण्याची कल्पना सुचली. तेव्हा बहुतेकांकडे फोन होते, पण इंटरनेट नव्हते.
कंपनी सुरू करण्यासाठी 50 हजार रुपये उभे करण्यास मणी यांना एक वर्ष लागले. 1997 मध्ये त्यांनी मुंबईत जस्ट डायल लाँच केली. नंबर होता 8888888. सहज लक्षात राहणारा क्रमांक. 3 बाय 5 फुटांच्या गॅरेजमध्ये भाड्याचे फर्निचर आणि कॉम्प्युटर घेऊन कंपनी सुरू झाली. आज देशातील 250 शहरांसह अमेरिकेतही जस्ट डायल सेवा पुरवते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.