कॉलेज संपल्यावर जुन्या मित्रांना भेटण्याची एकमेव संधी म्हणजे 'अल्युमिनाय मीट'. पण जॉब किंवा उच्च शिक्षणासाठी परदेशी किंवा इतर ठिकाणी गेलेल्या मित्रांना या कार्यक्रमात सहभागी होता येत नाही. अशावेळी न आलेल्या मित्रांची कमतरता जाणवते. ही उणीव भरून काढण्याची नवी आयडिया सायनच्या 'के जे सोमैया इन्स्टीट्यूट ऑफ इंजिनिअरिंग & आयटी' च्या 'अल्युमिनाईट' टीमने शोधून काढली आहे.
अल्युमिनाईटला जे मित्रमैत्रिणी हजेरी लावू शकणार नाहीत त्यांच्याशी
गुगल हँगआऊट वरून व्हिडीओ chat करण्यासाठी एक chatting डेस्क ठेवण्यात येणार आहे. या डेस्कवरून जमलेले मित्रमैत्रिणी बाहेरगावी असलेल्या विद्यार्थ्यांना सामील करून घेतील.
१७ जानेवारीला होणाऱ्या या मीटला आणखी फुलवण्यासाठी हँगआऊटबरोबरच टाईम कॅप्सूल आणि कॅरिओके सारखे इवेन्ट्ससुद्धा होणार आहेत. ही 'अल्युमिनाईट' सगळ्यांना अनेक अविस्मरणीय क्षण देईल हे नक्की.
- उत्कर्षा महाजन
utkarsha.mhjn5@gmail.com