आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुनरागमनासाठी काजोलला प्रतीक्षा दर्जेदार पटकथेची

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - एकेकाळी बॉलीवूडमध्ये दबदबा असणारी अभिनेत्री काजोल सध्या चित्रपटात पुनरागमन करण्यासाठी दर्जेदार पटकथेची वाट पाहत असल्याचे तिने नुकतेच सांगितले. अजय आणि काजोलला दुसरे अपत्य झाल्यानंतर तिने त्यानंतर चित्रपटापासून दूर राहणे पसंत केले. मात्र, 2010 मध्ये तब्बल नऊ वर्षानंतर ती शाहरुख खानसोबत माय नेम इज खान या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर चांगली कमाई केली होती. एखादी चांगली पटकथा मिळाल्यास आपण नक्की चित्रपटात काम करू, असे काजोलने सांगितले. काजोलसोबत माधुरी दीक्षित, करिश्मा कपूर, श्रीदेवी यांनादेखील पुनरागमनाचे वेध लागले आहेत.