आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘लालबाग राजा’समाेर पोलिसाला धक्काबुकी, कार्यकर्त्यांच्या मुजोरीची आणखी एक घटना उघड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - प्रसिद्ध लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या मुजोरीचा प्रत्यय अाता दरवर्षीच येऊ लागला अाहे. त्यांच्याबाबत भक्तांच्या अनेक तक्रारी असताना अाता या उर्मट कार्यकर्त्यांनी मंडळासमाेर बंदाेबस्ताला असलेल्या एका पोलिस अधिकाऱ्यालाच धक्काबुक्की करत शिवीगाळ केली.

मंडळाच्या मुख्य मंडपाजवळ शनिवारी दुपारी पोलिस उपनिरीक्षक सत्यवान पवार हे बंदोबस्तावर होते. त्या वेळी चार भक्तांनी मुख्य मंडपात शिरण्याचा प्रयत्न केला. त्यांना राेखणाऱ्या पवार यांच्यावर लालबागचा राजा मंडळाचा एक पदाधिकारी धावून आला. त्यावर पवार यांनीही त्या कार्यकर्त्याला मागे ढकलले. हा प्रकार पाहून मंडळाचे मानद सचिव सुधीर साळवी हे स्टेजवरून खाली उतरले आणि त्यांनी पवारांशी हुज्जत घातली. साळवी यांनी पवारांना शिवीगाळ करत धमकावण्याचा प्रयत्न केल्याचे इतर पाेलिसांनी सांगितले. एवढेच नव्हे, तर साळवी यांनी इतर कार्यकर्त्यांना बोलावून घेतले. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. विशेष म्हणजे हा सर्व प्रकार शनिवारी दुपारी घडूनही अजूनही एका कार्यकर्त्यावर अथवा पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल झालेला नाही. फक्त उपनिरीक्षक पवार यांचा जबाब नोंदवण्यात आला असून सीसीटीव्ही फुटेज तपासून पुढील कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांच्या वतीने सांगण्यात आले.

सात दिवसांत तिसरी घटना
मुंबई पोलिस आणि लालबागचा राजा मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची अथवा वादावादी होण्याची ही पहिली वेळ नाही. पहिल्याच दिवशी सुरक्षेसाठी तैनात असलेल्या एका महिला पोलिस अधिकाऱ्याबरोबर गैरवर्तणूक केल्याबद्दल या मंडळाच्या एका कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता, तर दोन दिवसांपूर्वी एका पोलिस निरीक्षकालाही धक्काबुक्की करण्यात आली होती. गेल्या सात दिवसांतील ही तिसरी घटना असूनही राजकीय दबावापोटी काहीच कारवाई होत नसल्याने या ठिकाणी बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांत प्रचंड संताप आहे.
असा घडला प्रकार..
एक महिला पत्रकार मंडळाचे सचिव सुधीर साळवी यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी स्टेजवर जात होती. दरम्‍यान त्‍यांना सत्यवान पवार यांनी अडवले. त्‍यांनीच एका पोलिसाच्‍या नातेवाईकांना चुकीच्या मार्गाने दर्शनासाठीही सोडले. महिला पत्रकाराला आत सोडा असे एका कार्यकर्त्‍याने म्‍हटले. रोहित श्रीवास्तव असे या कार्यकर्त्‍याचे नाव असल्‍याचे कळते; नंतर पीएसआय सत्यवान पवार यांनी रोहितला बेदम मारहाण केली, असा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे.

पोलिसाने दिली धमकी..
- मंडळाचे सचिव सुधीर साळवी यांनी सत्यवान पवार यांना मारहाणीचा जाब विचारला.
- पीएसआय पवार यांनी साळवी यांना शिवीगाळ करत धमकी दिल्‍याची माहितीही समोर आली.
- ‘तुमचा उत्सव बंद करून टाकेन…’अशी धमकी साळवी यांनी दिल्‍याचे कार्यकर्ते सांगतात.
- पोलिस- कार्यकर्त्‍यांच्‍या या मारहाणीत रोहितच्या कानाचा पडदा फाटला, अशीही माहिती आहे.
- हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्‍ये कैद झाला. रोहितला केईएम हॉस्पिटलमध्ये दाखल केले.
- याबाबत लालबागचा राजा मंडळाचे पदाधिकारी काळाचौकी पोलिसात तक्रार दाखल करण्यास गेले असता, त्यांची तक्रार दाखल करून घेण्यात आली नाही.
----------------------------------------------------------------------------------------------------
नंदूरबार- पोलिसांना मारहाण होण्याच्या घटना दररोज समोर येत आहेत. त्यामुळे खाकीचा जनतेतील धाक कमी झाल्याची चर्चा सुरु झाली आहे. नंदूरबारमध्ये दोन गणेश मंडळांमध्ये वाद झाला होता. तो सोडवण्यासाठी पोलिस उपनिरिक्षक सखाराम भदाणे गेले होते. तेव्हा मंडळांच्या कार्यकर्त्यांनी भदाणे यांनाच मारहाण केली. या प्रकरणी पोलिस तक्रार दाखल करण्यात आली आहे.
----------------------------------------------------------------------------------------------------
औरंगाबाद- जुना मोंठा भागातील भवानीनगरात भांडण सोडवायला गेलेल्या चार्ली पोलिसांना मारहाण झाल्याची घटना उघडकीस आली आहे. व्यवहारे नावाच्या व्यक्तीच्या घरासमोर काही तरुण दररोज उशीरापर्यंत बसायचे, गप्पा मारायचे. त्यांना व्यवहारे यांनी विरोध केला होता. त्याचा राग मनात ठेवून राहुल कंकरीया, शंभू चव्हाण, शैलेंद्र मोदिराज, प्रवीण गोरे यांनी व्यवहारे यांच्या घराचे दार रात्रीच्या सुमारास तोडण्यास सुरवात केली. संबंधित प्रकाराने घाबरलेल्या व्यवहारे यांनी पोलिसांना फोन केला. तेव्हा चार्ली पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पण पोलिसांना बघून न घाबरता आरोपींना त्यांना चक्क मारहाण करण्यास सुरवात केली. तुम्ही दादागिरी करता, तुमची नोकरीच घालवतो, तुम्हाला बघून घेऊ, अशा धमक्या पोलिसांची कॉलर धरून आरोपींनी दिल्या.
----------------------------------------------------------------------------------------------------
कल्याण-गणपती विसर्जनाच्‍यावेळी कल्याणमध्ये काही दिवसांपूर्वी एका पोलिस उपनिरीक्षकाला पाण्‍यात बुडवून मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. तिसगाव नाका परिसरात हा प्रकार घडला. नितीन डगळे असे या पोलिस उपनिरिक्षकाचे नाव आहे. पोलिसाला बुडवून मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.गुन्‍हा दाखल झालेले चार जण हे जरीमरी मंडळाचे आहेत.
कल्याणला पाेलिसावर लाेखंडी सळईने हल्ला
कल्याण येथील यादवनगरात राहणाऱ्या एका पोलिसावर तरुणाने लोखंडी सळईने हल्ला केला. उत्तम अाडसूळ असे जखमी पोलिसाचे नाव आहे. सचिन शेडगे हा हल्लेखाेर फरार झाला आहे. अाडसूळ हे ठाणे पोलिस मुख्यालयात कार्यरत आहेत. शनिवारी रात्री ड्यूटीवर जाण्यापूर्वी फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर आले होते. या वेळी शेजारीच राहणाऱ्या सचिनने त्यांच्या डोक्यात पाठीमागून लोखंडी सळईने प्रहार केला. यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात अाले.
पुढे स्‍लाइड्सव्‍दारे पाहा,
- नाशकात पोलिसावर प्राणघातक हल्ला
- असा केला पीएसआयला तलावात बुडवून मारण्‍याचा प्रयत्‍न..
- वाहतूक पोलिस विलास शिंदे कसे झाले शहीद..
- ठाण्‍यात कारचालकाने पोलिसाला फरफटत नेले..
- धुळ्यात पीएसआयला जमावाकडून मारहाण..
- संगमनेरमध्‍ये वाळू तस्‍करांकडून पोलिसांना मारहाण..
- पुण्यात कारचालक वाहतूक पोलिसाच्या हाताला चावला..
- विले पार्ले येथे एका महिला वाहतूक पोलिसाला दुचाकीस्वार महिलेने केली मारहाण..
- जालन्‍यात भाजप आमदाराच्या धमक्यांमुळे पोलिस निरीक्षकाचा आत्महत्येचा इशारा
- नाशकात पोलिसाच्‍या अंगावर रिक्षा घालून जीवे मारण्‍याची धमकी
अखेरच्‍या स्‍लाइडवर व्‍हिडियो, पीएसआला असे बुडवले पाण्‍यात
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...