आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फौजदाराला बुडवून मारण्याचा प्रयत्न; उद्धव ठाकरे, पोलिस पत्नी मुख्यमंत्र्यांना भेटल्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- राज्यात पोलिसांवर जीवघेणे हल्ल्याच्या घटना सुरूच अाहेत. मंगळवारी रात्री कल्याणमध्ये एका गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी फाैजदाराला पाण्यात बुडवून मारण्याचा प्रयत्न केला, तर दुसरीकडे पाेलिसांच्या संरक्षणाच्या मागणीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पाेलिसांच्या पत्नींसह बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यावर ‘पाेलिसांचे प्रश्न साेडविण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात येईल, असे अाश्वासन मुख्यमंत्र्यांनी ठाकरेंना दिले.

दुचाकीस्वाराच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेले वाहतूक पोलिस विलास शिंदे यांचा नुकताच मृत्यू झाला. त्यानंतर पाेलिसांच्या समस्यांना वाचा फुटली. गेल्या आठवड्यात पोलिस पत्नींनी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन या समस्या सोडवण्याची विनंती केली होती. या पार्श्वभूमीवर ठाकरेंनी बुधवारी पाेलिस पत्नींसह मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. पोलिसांच्या घराचे प्रश्न, अनुकंपा नोकर भरती, पोलिसांचे कामाचे तास कमी करावेत तसेच एखाद्या दुर्घटनेत जखमी पाेलिसांना तत्काळ चांगले उपचार मिळावेत आदी समस्यांचे निवेदन या वेळी मुख्यमंत्र्यांना देण्यात अाले.
या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना ठाकरे म्हणाले, ‘पोलिसांच्या समस्या सोडवण्यासाठी एक समिती नेमावी, अशी मागणी अाम्ही केली आहे. या समितीत सरकारी अधिकारी आणि पोलिस कुटुंबीयांचा समावेश असावा. तसेच पोलिसांच्या समस्यांचा आढावा घेऊन मार्ग काढावा,’ असेही सुचवण्यात अाले. त्यावर मुख्यमंत्र्यांनी समिती नेमण्याबाबत सकारात्मकता दाखवली आहे. पोलिसांवरील हल्ल्यामुळे त्यांचे कुटुंबीयदेखील भयभीत झाले आहे. त्यामुळे पोलिसांच्या केसाला धक्का लागता कामा नये. पोलिसांवर जो कुणी हल्ला करेल त्याच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. शिवसेना विरोधी पक्षात असताना ज्या मागण्या केल्या होत्या त्या पूर्ण करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले अाहे.’

स्वतंत्र गृहमंत्री नेमा
उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले. ‘मुख्यमंत्री चांगले काम करीत आहेत, परंतु त्यांच्या कामाचा व्याप जास्त आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी गृह खात्याचा कार्यभार अन्य मंत्र्यांकडे द्यावा,’ अशी मागणीही ठाकरे यांनी केली. गेल्या चार दिवसांत उद्धव ठाकरे यांनी दोन वेळा स्वतंत्र गृहमंत्री नेमण्याची मागणी केली अाहे.
बातम्या आणखी आहेत...