आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kalyan Dombivali Municipal Corporation Election 2015 Result Live

KDMC RESULT: सेना बहुमतापासून दूरच; काँग्रेस, NCP, MNS चा धुव्वा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत शिवसेनेने अनपेक्षित अशी घौडदौड केली मात्र बहुमतापासून त्यांना थोडे दूर राहावे लागले. प्रथमच स्वबळावर लढलेल्या शिवसेनेने भाजपला जोरदार धोबीपछाड दिला आहे. भाजपनेही जोरदार लढत देताना 42 जागा जिंकल्या. मागच्या वेळी 28 जागा जिंकणा-या मनसेचाही कल्याण-डोंबिवलीकरांनी धुव्वा उडविला असून या पक्षाला केवळ 9 जागाच जिंकता आल्या आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी तर येथे भुईसपाट झाली असून काँग्रेसला 4 तर राष्ट्रवादीला केवळ 2 जागा जिंकल्या आहेत. अपक्ष व इतरांनी 11 जागा जिंकल्या.
पक्षीय बलाबल असे-
- शिवसेना 52
- भाजप 42
- मनसे 9
- काँग्रेस 4
- राष्ट्रवादी 2
2010 च्या निवडणुकीत कल्याण-डोंबिवली महापालिकेतील पक्षीय बलाबल कसे होते???
शिवसेना- 31, भाजप-9, काँग्रेस-15, राष्ट्रवादी काँग्रेस-15, मनसे-28, व अपक्ष-10 असे पक्षीय बलाबल होते.
2.00 PM : 122 पैकी 112 जागांचे कल स्पष्ट, शिवसेना 64, भाजप 30, मनसे 7, एमआयएम 4, काँग्रेस 3, राष्ट्रवादी 2 तर इतर 6 जण आघाडीवर
1.10 PM: 122 पैकी 110 जागांचे कल स्पष्ट, शिवसेना 60, भाजप 28, मनसे 12, एमआयएम 4, काँग्रेस 3, राष्ट्रवादी 3 तर इतर 3 जण आघाडीवर
12.45 PM: 122 पैकी 101 जागांचे कल स्पष्ट, शिवसेना 52, भाजप 28, मनसे 12, एमआयएम 4, काँग्रेस 3, राष्ट्रवादी 3 तर इतर 3 जण आघाडीवर
12.20 PM: 122 पैकी 91 जागांचे कल स्पष्ट, शिवसेना 50, भाजप 28, मनसे 6, एमआयएम 4, काँग्रेस 3, राष्ट्रवादी 2 तर इतर 5 जण आघाडीवर
12.11 AM : कल्याण-डोंबिवलीत MIM ला आतापर्यंत 4 जागा
11.39 AM: MIM च्या सकिला खान विजयी
11.35 AM: मनसेचे सरोज भोईर व प्रकाश भोईर विजयी, हे दोघेही पती-पत्नी आहेत.
11.29 AM: कल्याणमध्ये MIM ने खाते खोलले, MIM च्या पानभिला मैलवी विजयी
11.25 AM: 56 पैकी 31 जागांवर शिवसेना आघाडीवर तर भाजप 20 जागांवर आघाडीवर
11.17 AM: शिवसेनेच्या विद्यमान महापौर कल्याणी पाटील 50 मतांनी पराभूत, भाजपच्या सुमन निकम विजयी.
10.49AM: 27 गावांतील पहिला सेनेच्या बाजूने, शिवसेनेच्या प्रमिला पाटील विजयी...
10. 47AM: राष्ट्रवादीचे संतोष तरे विजयी, केडिएमसीचा पहिला निकाल राष्ट्रवादीच्या बाजूने.
पुढे आणखी वाचा, कल्याण-डोंबिवली निकालासंदर्भात....
आणि....
राज ठाकरेंच्या मनसेला नाकारले
कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे पानिपत
एमआयएमला मिळाल्या चार जागा
लोकांचे लक्ष केवळ देवेंद्र-उद्धव यांच्याकडे