आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कल्याणचे दोन बेपत्ता युवक झाले ISIS चे दहशतवादी, कुटुंबीयांना फोनवर दिली माहिती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कल्याण- येथील दोन बेपत्ता युवकांनी या आठवड्याच्या सुरवातील कुटुंबीयांना फोन करून इस्लामिक स्टेट ऑफ इराक अॅण्ड सिरियासाठी (ISIS) हिंसाचार करीत असल्याचे सांगितले आहे. सध्या दोघे युवक सिरियातील रक्का प्रांतात रक्तपात करीत असल्याचे सांगण्यात आले आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरिफ माजिद आणि सलिम तंकी असे या युवकांची नावे आहेत. त्यांनी कुटुंबीयांना सांगितले आहे, की आम्ही ISIS साठी जे काम करीत आहेत, त्यामुळे संपूर्ण कुटुंब जन्नतमध्ये जाईल. आम्ही सुरक्षित आहेत. दररोज धार्मिक युद्धात सहभागी होत आहोत.
आरिफ आणि सलिम यांनी हेही सांगितले, की कल्याण येथील दोन युवक अमन तंडेल आणि फहाद शेख हेही ISIS साठी हिंसाचार करीत आहेत. तेही सुरक्षित आहेत. दोन समुहांमध्ये चौघे राहत आहेत. दोन वेगळ्या प्रांतात त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
दोन्ही कुटुंबीयांनी दिली एटीएसला माहिती...वाचा पुढील स्लाईडवर