आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेते निर्माण करणार्‍यांना अनुयायांची गरज लागत नाही; कमलाकर सोनटक्के यांचे मत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पु. भा. भावे नगरी (डोंबिवली)- जे लोक अनुयायी निर्माण न करता नेते निर्माण करतात त्यांना अनुयायांची गरज लागत नाही.  मला पत्नी हि अनुयायी म्हणून नव्हे तर नेता म्हणून  हवी होती. ते नेतृत्व कांचन सोनटक्के यांच्याकडे आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ रंगकर्मी  कमलाकर सोनटक्के यांनी केले.

विचार जागर कार्यक्रमांतर्गत रंगकर्मी कमलाकर सोनटक्के आणि त्यांच्या पत्नी कांचन सोनटक्के यांची मुलाखत घेतली. डॉ सतीश साळुंखे आणि अजय गांपावर यांनी त्यांना बोलते केले.

आपल्या संसाराच्या प्रवासाबद्दल बोलताना सोनटक्के म्हणाले की,  कांचन विद्यार्थी म्हणून माझ्या जीवनात आली नसती तर कदाचित लग्न या विषयाकडे मी गांभीर्याने बघितले नसते. माझे गुरू तापसी अवताराचे होते. त्यामुळे तसाच काहीसा मी होतो.   माझ्या सारख्या शिक्षकासाठी कमिटमेंट महत्वाची असते. दुसऱ्या दर्जाचे नाही तर प्रथम दर्जाचे काम हवे हा माझा आग्रह होता. त्यामुळे अशा माणसाबरोबर संसार करणे व टिकवणे ही  तारेवरची कसरत होती. ती सहन करण्याची क्षमता माझ्या पत्नी मध्ये होती म्हणून संसार टिकला असेही ते म्हणाले.

साहित्य संघाकडून मला व्यावसायिक नात्यासाठी आग्रह होत होता पण तो टाळून मी  मुलांना नाट्यशिक्षण देण्याचे ठरवले.  कारण मला अनुयायी नाही तर नेते निर्माण करायचे होते.  तसे नेतृत्व मी नाट्य प्रशिक्षणात निर्माण करू शकलो याबादल सोनटक्के यांनी समाधान व्यक्त केले.

दिव्यांग मुलांमध्ये संवादाचा अभाव असतो. त्यांच्यातील उनिवामुळे त्यांना इतर मुलांसारखे वागवले जात नाही.  बालपणा पासून मिळालेल्या सामाजिक बांधिलकीच्या एक भाग म्हणून मी व्यावसायिक नाटके व चित्रपटाकडे न वळता या मुलांसाठी काम करण्याचे ठरवले. नाट्य क्षेत्रातील अनुभवाचा उपयोग या मुलांसाठी करता आला याचे खूप समाधान मिळाले असे कांचन सोनटक्के म्हणाल्या.
 
बाल नात्याबद्दल बोलताना त्या म्हणाल्या कि बालनाट्य शिबिरे चलवण्यात संस्था उत्साही असतात. पण त्याला अर्थार्जनाची जोड लागली असून ते चुकीचे आहे बालरंगभूमी सामाजिक चळवळ म्हणून चालवली तर शिबिरात खरे कलावंत निर्माण होतील.  बालनाट्याचे विषय काय असावे या कडे देखील गांभिर्याने बघण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

 
पुढील स्लाइडवर पाहा... ज्येष्ठ रंगकर्मी कमलाकर सोनटक्के आणि त्यांच्या पत्नी कांचन सोनटक्के यांच्या मुलाखतीचे फोटोज...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...