आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे आहेत के व्ही कामत, जे बनले 100 अब्ज डॉलरच्या ब्रिक्स बँकेचे प्रमुख

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारताच्या पुढाकाराने सुरु झालेली ब्रिक्स बॅंकेचे पहिले प्रमुख भारताचे के व्ही कामत बनले आहेत. ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण अफ्रिका या विकसनशील पण मोठी अर्थव्यवस्था असलेल्या पाच देशांनी एकत्र येऊन या बँकेची स्थापना केली आहे. ही बॅंक जागतिक बॅंकेच्या धर्तीवर काम करेल. मात्र, तिचे कार्यक्षेत्र या पाच देशापुरतेच मर्यादित राहील. के व्ही कामत ब्रिक्स बँकेचे प्रमुख म्हणून 6 वर्षे काम पाहतील. ब्रिक्स बँकेचे मुख्यालय चीनमधील शंघाय शहरात असणार आहे. या बँकेसाठी या 5 देशांनी प्राथमिक भांडवल म्हणून सुमारे 50 अब्ज डॉलर ( सुमारे 3150 अब्ज रूपये) गोळा केले आहे. ज्यात 5 ही देशाचा समान वाटा आहे.
ब्रिक्सचे पहिले प्रमुख असणारे कामत यांच्याविषयी...
- के व्ही कामत यांचे पूर्ण नाव आहे, कुंदापुर वामन कामत.
- त्यांचा जन्म 2 डिसेंबर, 1947 रोजी कर्नाटकातील मंगलोर येथे झाला.
- त्यांना दोन मुले आहेत, मुलगा अजय आणि कन्या अजन्या कामत.
- एनआयटी कर्नाटकमधून त्यांनी मॅकनिकल इंजिनियरिंगची पदवी घेतली.
- कामत यांनी त्यानंतर आयआयएम अहमदाबादमधून आर्थिक विषयाची पदवी घेतली.
- 2008 मध्ये कामत यांना पद्मभूषण देण्यात आला.
पुढे वाचा, ब्रिक्स बॅंकेच्या प्रमुखपदी निवड होण्याआधी कामत येथे कोठे-कोठे कोणत्या पदावर काम केले....
बातम्या आणखी आहेत...