आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रिटिश सैनिकांसाठी 80 च्या दशकात बनला कामाठीपुरा, अशी होती LIFE

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - देशातील दुसरा सर्वात मोठा रेड लाइट एरिआ कामाठीपुरामध्ये आज हजारो सेक्स वर्कर्स अतिशय वाइट आयुष्य जगत आहेत. ब्रिटिशांनी आपल्या सैनिकांच्या 'कमफर्ट झोन'साठी हा परिसर विकसित केला होता. मात्र, येथे राहणाऱ्या सेक्स वर्कर्ससाठी हे नरकापेक्षा कमी नाही. 1980 मध्ये अमेरिकन फोटोग्राफर मॅरी एलेन मार्क यांनी कामाठीपुरातील त्या वेळची लाइफ कॅमेऱ्यात टिपली आहे. या छायाचित्रांमधून त्यांनी सेक्स वर्कर्सला मिळणाऱ्या यातना आणि भावना मांडण्याचा प्रयत्न केला. 
 
 
- मॅरी एलेन मार्क यांनी कामाठीपुरा येथे टिपलेल्या छायातचित्रांना 'द केज गर्ल्स ऑफ बॉम्बे' असे नाव देण्यात आले होते. 
- त्यांच्या छायाचित्रांची ही मालिका जगभर प्रसिद्ध आहे. त्यासाठी मॅरी मार्क यांनी तीन महिने कामाठीपुऱ्यात काढले होते. 
- या छायाचित्रांमध्ये त्यांनी सेक्स वर्कर्सला होणारे आजार, अत्याचार आणि दारिद्र्य दाखवण्याचा प्रयत्न केला होता. 
 

1980 च्या दशकात असे होते हाल
- सध्याच्या तुलनेत कामाठीपुरामध्ये 80 च्या दशकात मोठ्या संख्येने सेक्स वर्कर्स होत्या. त्यापैकी काही बार गर्ल्स होत्या. 
- त्यावेळी देहविक्रय करणाऱ्या महिलांचे पुनरवसन आणि देखभाल करण्यासाठी सरकार किंवा एनजीओ सुद्धा नव्हत्या.
- मात्र, देश-विदेशातून आलेल्या एनजीओंमुळे येथील सेक्स वर्कर्सची लाइफ बदलली. 
- आज कित्येक सेक्स वर्कर्सची मुले-मुली परदेशात शिक्षण घेत आहेत. तर अनेकींनी देहविक्रय सोडला आहे. 
 

अंडरवर्ल्डचे अड्डे
- 80 आणि 90 च्या दशकात या परिसरात अंडरवर्ल्डची चलती होती. 
- दाऊद इब्राहिम, छोटा राजन, विक्की गोस्वामीसह अनेक गँग्स्टर येथे येत होते. 
- त्यामुळे, देहविक्रय व्यतीरिक्त अमली पदार्थ आणि इतर धंदे सुद्धा वाढले होते. 
 

आता काय आहे परिस्थिती?
- कामाठीपुरा आता ह्यूमन ट्रॅफिकिंगचा मोठा अड्डा होत आहे. 
- बांग्लादेश आणि इतर देशांतून मुलींना बळजबरी येथे आणले जात आहे. 
- त्यांना अंधाऱ्या खोलीत ठेवून हार्मोन्सचे इंजेक्शन्स दिले जातात. त्यांना मंद करण्यासाठी सुद्धा विविध प्रकारचे ड्रग्स दिले जातात. 
- अमली पदार्थांचे व्यसन लावून त्यांना देहविक्रयासाठी भाग पाडले जाते. एकाच रात्रीत एका मुलीला 5 ते 6 ग्राहकांकडे पाठवले जाते. मनाई केल्यानंतर या मुलींना बेदम मारहाण सुद्धा केली जाते.
बातम्या आणखी आहेत...