आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Kamroon And Chife Minister Discuss On Various Issues

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कॅमरॉन व मुख्यमंत्री यांच्यात विविध विषयांवर चर्चा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मुंबई - भारताच्या दौ-यावर आलेले ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरॉन आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची सोमवारी हॉटेल ताज येथे भेट झाली. यावेळी उद्योग, शिक्षण, पायाभूत सुविधा आदी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. मुंबईला जागतिक दर्जाचे शहर बनवण्यासाठी राज्य सरकार करत असलेल्या प्रयत्नांची माहिती यावेळी मुख्यमंत्र्यांनी कॅमेरॉन यांना दिली. तसेच शहराच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी ब्रिटनकडून सहकार्याचीही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. या चर्चेत मुंबई मेट्रोचा विस्तार, मुंबई-दिल्ली इंडस्ट्रिअल कॉरिडॉर, नवी मुंबई विमानतळ, ट्रान्स हार्बर लिंक या प्रकल्पांची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. कॅमेरॉन यांच्यासोबत एक शिष्टमंडळही भारत भेटीवर आले असून त्यामध्ये नगरचनाकार, वित्तीय तज्ज्ञ आदींचा समावेश आहे. कॅमेरॉन यांनी मुंबई तसेच राज्यामध्ये गुंतवणुकीची इच्छा व्यक्त केली. तसेच राज्य सरकारच्या काही योजना व प्रकल्पांचे कौतुकही केले.