आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कंगनाने नाकारली दोन कोटींची जाहिरात, सावळेपणाचा अवमान नको म्हणून नकार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - जगातील कराेडाे सावळ्या रंगाच्या लाेकांचा अवमान हाेऊ नयेे, या उदात्त हेतूने बाॅलीवूड अभिनेत्री कंगना राणावत हिने गाेरेपणाचा दावा करणारी फेअरनेस क्रीमची जाहिरात नाकारली. यासाठी तिने तब्बल दाेन काेटी रुपयांवर पाणी साेडले. ‘आपली बहीण सावळी आहे. ही जाहिरात केली असती तर तिचा व तिच्या सारख्या असंख्य लोकांचा अपमान झाला असता,’ असे कारण तिने यासाठी दिले अाहे.

"क्वीन'पाठोपाठ "तनू वेड्स मनू रिटर्न्स' या चित्रपटामधील दमदार अभिनयासाठी कंगनाचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे. बॉक्स ऑफिसवर कंगनाची चलती बघून अनेक कंपन्या कंगनाला ब्रँड अॅम्बेसेडर बनवण्यास इच्छुक आहेत. काही दिवसांपूर्वी कंगनाला एका प्रसिद्ध फेअरनेस क्रीमच्या जाहिरातीची ऑफर आली होती. यासाठी तिला तब्बल दोन कोटी रुपयांचे मानधन देण्याची तयारीही कंपनीने दर्शवली होती. मात्र, कंगनाने नम्रपणे ही जाहिरात नाकारली.
कंगना म्हणाली, ‘मला फेअरनेस (गाेरेपणा) ही संकल्पनाच पटत नाही. माझी बहीण सावळ्या रंगाची अाहे. मात्र तीदेखील माझ्या सारखीच सुंदर दिसते. फेअरनेस क्रीमची जाहिरात करून मी तिचा अपमान केला असता. मी सेलिब्रिटी असून मला समाजासमोर चुकीचा आदर्श ठेवायचा नाही,’ असे तिने सांगितले. जाहिरात निवडताना कंगनाने दाखवलेला हा समजूतदारपणा अन्य कलाकारांसाठी आदर्श असल्याचे तिच्या कुटुंबीयांनी सांगितले.

कॉस्मेटिकचा व्यवसाय तब्बल ९ हजार कोटींवर
भारतात सध्या ९ हजार कोटी रुपयांचा कॉस्मेटिकचा व्यवसाय आहे. यातील सुमारे ३ हजार कोटी हे फेअरनेस क्रीमच्या व्यवसायात आहेत. एका अहवालानुसार वर्षाच्या शेवटपर्यंत हा व्यवसाय १८ हजार कोटींपर्यंत जाईल. या व्यवसायातील बहुतांश कंपन्या अापल्या जाहिरातीतून गाेरेपणा अाणण्याचा दावा करत असतात.
तनू वेड्स मनू रिटर्न्सची बॉक्स ऑफिसवर धूम
"तनू वेड्स मनू' या चित्रपटाचा सिक्वेल "तनू वेड्स मनू रिटर्न्स' या चित्रपटाने पहिल्या आठवड्यात ४० कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. आणखी काही दिवसांत हा चित्रपट १०० कोटींचा व्यवसाय करेल, अशी अपेक्षा चित्रपट जाणकार कोमल नाहटा यांनी व्यक्त केली आहे. या चित्रपटात कंगणा राणावत, आर. माधवन या प्रमुख कलाकारांसह इतरांच्या भूमिका आहेत.
बातम्या आणखी आहेत...