मुंबई - बॉलीवूडमध्ये अल्पावधीत आपले वेगळे स्थान निर्माण करणारी अभिनेत्री कंगना राणावतचे ‘तन्नू वेड्स मन्नू रिटर्न्स’ या चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वत्र कौतुक होत आहे. कंगनावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत असताना ती मात्र अभिनेत्री दीपिका पदुकोनवर नाराज असल्याची चर्चा आहे.
कंगनाने दीपिकाला ‘तन्नू वेड्स मन्नू रिटर्न्स’ हा तिचा चित्रपट पाहण्यासाठी निमंत्रण दिले होते. पण दीपिकाकडून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे कंगना नाराज अाहे.
दीपिकाचा ‘पिकू’ या चित्रपट पाहण्यासाठी कंगना अावर्जुन उपस्थित होती. मात्र, दीपिकाने असा मनाचा मोठेपणा दाखवला नाही. ‘दीपिकाच्या मार्गात अनेक अडचणी आल्या पण त्यातून तिने मार्ग शोधला आहे. तिची तुलना कोणाबरोबरही होऊ शकणार नाही’, असेही कंगनाने त्यावेळी सांगितले हाेते. बाॅलीवूडमध्ये एकमेकांशी स्पर्धा करत असलेल्या या अभिनेत्रींमधील काैतुकाचा भाव तेव्हा चर्चेचा विषय झाला हाेता. मात्र अाता कंगणाने दीपिकाबाबत व्यक्त केलेल्या नाराजीबाबत पुन्हा वेगळीच चर्चा घडत अाहे.
नेहमीच समर्थन : कंगना
मी नेहमी माझ्या सहअभिनेत्रींचे समर्थन करते, त्यांना पाठिंबा देते पण जेव्हा आपल्याला प्रतिसाद मिळत नाही, तेव्हा खूप वाईट वाटते. त्यामुळे असे यापुढे तरी कोणी करू नये,अशी अपेक्षा तिने व्यक्त केली.