आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधान परिषद गॅलरीत जाण्यापासून कन्हैया कुमारला राेखल्याचा अाराेप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ‘जेएनयू’तील वादग्रस्त विद्यार्थी नेता कन्हैया कुमारला मंगळवारी विधिमंडळाचे कामकाज पाहण्यापासून रोखण्यात अाल्याचा अाराेप हाेत अाहे. शेकापचे नेते जयंत पाटील यांच्या अर्जावरून कन्हैयाला विधान परिषदेचा दिला हाेता. मात्र विधिमंडळाच्या प्रवेशद्वारावरच त्याला सुरक्षा रक्षकांनी अडविले व कार्यालयात नेऊन त्याची तपासणी केली. कन्हैया विधान परिषदेत येणार नाही याची ‘काळजी’ सरकारी यंत्रणेकडून घेण्यात अाला. काही वेळाने स्वत: जयंत पाटलांनी येऊन त्याला घेऊन गेले, मात्र ताेपर्यंत कन्हैयाला पासवर दिलेली वेळ संपली असल्याने त्याला परत जावे लागले.

मंगळवारी सकाळी केरळवरून विमानाने कन्हैया मुंबईत अाला. त्याला देण्यात अालेल्या विधान परिषदेच्या गॅलरीच्या पासवर दुपारी १२ ते १ ची वेळ देण्यात अाली हाेती. विमानतळावरून मंत्रालय परिसरात येईपर्यंत कन्हैयाला १२.३० झाले होते. त्याने आत प्रवेश घेतल्यानंतर चौकशीत अर्धा तास गेला. त्यानंतर मात्र सभागृहाचे कामकाज संपल्याने त्याला अात प्रवेश देता अाला नसल्याचे सरकारी यंत्रणेचे म्हणणे अाहे.
हा तर लोकशाहीचा अपमान : जयंत पाटील
आमदाराच्या अर्जावर पासेस तयार झाल्यावर संबंधित व्यक्तीला कामकाज पाहण्यावाचून रोखता येत नाही. आमदार स्वत: कन्हैयाला नेण्यासाठी आले असतानाही त्याला रोखले गेले तर हा एक प्रकारे लोकशाहीचा अपमान आहे, अशी प्रतिक्रिया शेकापचे नेते जयंत पाटील यांनी व्यक्त केली. पृथ्वीराज चव्हाण यांच्या मते, ‘एखाद्या नेत्याने कामकाज पाहण्याची इच्छा व्यक्त केली तर त्यात गैर काही नाही. अशा रीतीने वागणे म्हणजे हुकूमशाहीला खतपाणी घालण्याचा प्रकार आहे.’
कामकाज संपल्याने परवानगी नाही : बाेराटे
कन्हैयाकुमार यांच्या पासेसची वेळ ही १२ ते १ होती. तो विधिमंडळात आला तेव्हा १२.३० झाले होते. याच वेळी विधान परिषदेत कामकाज आधीच तहकूब झाले होते. त्यानंतर आणखी अर्ध्या तासासाठी कामकाज तहकूब झाले. कामकाज सुरू नसल्यामुळे त्यांना विधान परिषदेचे कामकाज पाहण्यासाठी पाठवण्यात आले नाही, अशी प्रतिक्रिया विधान भवनाचे मुख्य सुरक्षा अधिकारी शशिकांत बोराटे यांनी दिली.
बातम्या आणखी आहेत...