आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कन्हैया कुमार मुंबईत दाखल, चैत्यभूमीवर बाबासाहेबांना केले अभिवादन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दादरमधील चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करताना कन्हैया कुमार व इतर सहकारी... - Divya Marathi
दादरमधील चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करताना कन्हैया कुमार व इतर सहकारी...
मुंबई - जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी नेता कन्हैयाकुमार मुंबईत दाखल झाला आहे. दुपारी 1 च्या सुमारास त्याचे मुंबईत आगमन होताच डाव्या चळवळीतील कार्यकर्त्यांनी त्याचे जोरदार स्वागत केले. त्यानंतर कन्हैयाने दादरमधील चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. यानंतर सीपीएमचे कार्यकर्ते कन्हैयाकुमारला टिळकनगरमधील आदर्श विद्यालयातील सभास्थानी घेऊन रवाना झाले. दुपारी दोन वाजता कन्हैया कुमार तेथे संबोधित करेल. नागपुरात संघ परिवार आणि मोदी सरकारवर सडकून टीका केल्याने अस्वस्थ झालेल्या भाजपने कन्हैयाची मुंबईतील सभा होऊ न देण्याचे केलेले प्रयत्न अखेर अपयशी ठरले आहे.

आदर्श विद्यालयात ही सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र, सरकारच्या दबावामुळे या शाळेने अखेरच्या क्षणी ना हरकत प्रमाणपत्र देण्यास नकार दिल्याचा आरोप आयोजकांनी केला आहे. कन्हैयाची सभा मुंबईत होऊ नये म्हणून सरकार करत असलेल्या खटपटींची माहिती आयोजकांनी पत्रकार परिषद घेऊन दिल्यावर सरकारवर टीका होऊ लागल्यानंतर सूत्रे हलली आणि पोलिसांनी स्वत: बोलावून आयोजकांना परवानगी आणि वक्त्यांना संरक्षण पुरवण्यात येत असल्याचे सांगितले.

वरळीतील जनता शाळेत ही सभा आयोजित करण्यात आली होती. पोलिसांनी शाळेवरच दबाव टाकल्याने हा प्रकार घडला असून आता हा कार्यक्रम आम्ही टिळकनगर येथील आदर्श विद्यालयात शनिवारी दुपारीच घेणार आहोत. यासाठी आता शाळेने आम्हाला एनओसी दिली असली तरी आणि या वेळीही पोलिस आम्हाला येथेही कार्यक्रम घेण्यास परवानगी देण्यास तयार नसले तरी आम्ही कोणत्याही स्थितीत हा कार्यक्रम घेणारच आहोत, असा निर्धार स्टुटंड्स यूथ असेंब्ली अगेन्स्ट डिस्क्रिमिनिशन या विद्यार्थी संघटनांच्या फोरमने व्यक्त केला.
मुंबई पोलिसांनी फेटाळले आरोप
कार्यक्रम जिथे आयोजित करण्यात आला त्या स्थळाची मालकी असलेल्यांनी ना हरकत प्रमाणपत्र दिल्यास आम्हाला कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत काहीही तक्रार नाही. वक्त्यांना आणि कार्यक्रमाला आम्ही पूर्ण संरक्षण देऊ, असा दावा मुंबई पोलिस प्रवक्ते धनंजय कुलकर्णी यांनी केला.