आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kanhaiya Kumar Speech At Chembur, Mumbai, Massive Turnout At Mumbai

जगभ्रंमती केलेले नरेंद्र मोदी मराठवाड्यात का गेले नाहीत? कन्हैया कुमारचा सवाल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - नरेंद्र मोदी, तुम्ही साऱ्या जगात िफरता, मराठवाड्यात दुष्काळाची भयंकर परिस्थिती असताना या ठिकाणी तुम्ही का आला नाहीत, असा सवाल िवद्यार्थी नेता कन्हैयाकुमारने पंतप्रधानांना केला. येथे शनिवारी विद्यार्थी युवक मेळाव्यात तो बोलत होता. कन्हैयाने मोदी, भाजप सरकार तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यावर चौफेर टीका करत िवद्यार्थ्यांसह या देशातील कामगार, शेतकरी, मजूर, बेरोजगारांना एका व्यासपीठावर येण्याचे आवाहन केले.
आॅल इंिडया स्टुडंट‌्स फेडरेशनने या मेळाव्याचे आयोजन केले होते. मेळाव्याला कन्हैयासह देशात वेगवेगळ्या भागांत असलेल्या िवद्यापीठातील िवद्यार्थी नेते उपस्थित होते. तासाभरापेक्षा अधिक वेळ आक्रमक भाषणात कन्हैयाकुमारने मोदी सरकारविरोधात एल्गार तर पुकारलाच, वर भविष्यात भाजप सरकारला ठोस पर्याय देण्याचे पाऊल उचलले जात असल्याचे संकेतही दिलेे.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, कन्हैयाकुमारला जितेंद्र आव्हाड यांनी पळवले... मराठवाड्यातील दुष्काळाबाबत चिंता