आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अवैध बांधकाम प्रकरण : कपिल शर्मा, इरफान खानला दिलासा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - गोरेगावच्या डीएलएफ इनक्लेव्ह इमारतीतील आपल्या सदनिकेत अवैध पद्धतीने केलेल्या बदलाबाबत अभिनेता कपिल शर्मा व इरफान खान यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून दोन आठवड्यांचा दिलासा मिळाला आहे. मुंबई मनपाच्या नोटिसीला दोघांनी आव्हान दिले होते.
न्यायालयाने या प्रकरणात याचिकाकर्त्यास दिलासा देत म्हटले की, येत्या दोन आठवड्यांपर्यंत सदनिकेत नवीन बांधकाम होणार नाही की बदलही केला जाणार नाही. विनोदी अभिनेता कपिल शर्मा पाच लाखांची लाच मागितल्याबाबत मोदींना केलेल्या टि्वटवरून मुंबई मनपाच्या रडावर आला होता. त्या प्रकरणात आता कपिलच्या बंगल्यासोबत अन्य ६६ बंगलेही कारवाईच्या जाळ्यात आले आहेत. या बंगल्यांच्या मालकांनाही अवैध बांधकाम केल्याचे मनपाने म्हटले आहे. याबाबत लवकरच त्यांच्यावरही कारवाई होऊ शकते.
बातम्या आणखी आहेत...