आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑफिसचे बेकायदा बांधकाम तोडण्याच्या नोटीस विरोधात बॉम्बे हायकोर्टात पोहोचला कपिल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई : कॉमेडियन कपिल शर्माने आपल्या ऑफिसचे बेकायदा बांधकाम तोडण्याच्या नोटीस विरोधात मुबई उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. मुंबई महानगरपालिकेने (बीएमसी) कपिलला त्याचे वर्सोव्हा स्थित ऑफिसचे बेकायदा बांधकाम तोडणार असल्याची नोटीस पाठवली होती.

बीएमसीने 16 जुलै रोजी पाठवली होती नोटीस
- कपिल शर्माने महापालिकेच्या अधिकाऱ्याने पाच लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप केल्यानंतर या प्रकरणाची चौकशी झाली आणि यामध्ये कपिल शर्मा हाच बेकायदा बांधकामाच्या गुन्ह्यामध्ये अडकला.
- बीएमसीने या संदर्भात कपिलला 16 जुलैला नोटीस पाठवून काम थांबवण्यास सांगितले होते. परंतु त्यानंतरही कपिलने काम चालू ठेवले.

कपिलने पंतप्रधान मोदींना केले भ्रष्टाचाराच्या आरोपाचे ट्विट
- 9 सप्टेंबरला कपिलने पहिल्या ट्विटमध्ये मोदींना टॅग करून लिहिले की, "मागील 5 वर्षांपासून मी 15 कोटी रुपये प्राप्तिकर भरत आहे. तरीही मला माझ्या ऑफिससाठी बीएमसीला 5 लाख रुपयांची लाच द्यावी लागत आहे.
- दुसऱ्या ट्विटमध्येही पंतप्रदान मोदींना टॅग करून लिहिले की, "हेच आहेत का तुमचे अच्छे दिन?"
- कपिलचे हे ट्विट काही वेळातच व्हायरल झाले आणि राज्याच्या राजकारणात यामुळे एकच खळबळ उडाली. सर्वत्र राजकीय आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा उडला.
- ट्विटवरून वादळ उठल्यानंतर कपिल शर्माने नरमाईची भूमिका घेत नवीन ट्विट करून लिहिले की, आपण कोणत्याही पक्षाला दोषी धरत नसून केवळ व्यक्तीवर आपला अाक्षेप आहे.
- त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून लिहिले की, "कपिलजी पूर्ण माहिती द्या. एमसी, बीएमसीला कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. आम्ही आरोपीला सोडणार नाहीत."

पुढील स्लाइडमध्ये पाहा, कपिल शर्माचे ट्विट आणि त्याला मुख्यमंत्री फडणवीसांचे रिट्विट....
बातम्या आणखी आहेत...