आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कपूर घराण्यात तिसरा फाळके पुरस्कार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अभिनेते शशी कपूर यांना चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च 'दादासाहेब फाळके' पुरस्कार रविवारी मुंबईतील पृथ्वी थिएटरमध्ये केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. प्रकृती अस्वास्थ्यामुळे कपूर दिल्लीत ३ मे रोजी झालेल्या पुरस्कार प्रदान समारंभास जाऊ शकले नव्हते. त्यामुळे जेटलींनी मुंबईत येऊन त्यांना गौरवले. पृथ्वीराज कपूर, राज कपूर यांच्यानंतरचा या कुटुंबातील हा तिसरा दादासाहेब फाळके पुरस्कार आहे.

कलावंतांची मांदियाळी : या समारंभाला महानायक अमिताभ बच्चन, वहिदा रेहमान, रेखा, हेमा मालिनी, आशा पारेख, झीनत अमान, शबाना आझमी, सुप्रिया पाठक, नीतू सिंग, गायिका आशा भोसले, अभिषेक बच्चन यांच्यासह बॉलीवूडमधील अनेक दिग्गजांसह कपूर कुटुंबीयांची उपस्थिती होती.

परंपरा पुढेही सुरू राहील याची खात्री
‘कपूर कुटुंबात तिस-यांदा हा पुरस्कार दिला जात आहे. या परिवाराने अप्रतिम कलाकारीने सर्वांची मने जिंकली आहेत. त्यामुळे हा पुरस्कार कुटुंबातील अखेरचा पुरस्कार नसेल. हीच परंपरा पुढेही अशीच सुरू राहील, याची खात्री आहे. - अरुण जेटली, केंद्रीय अर्थमंत्री
बातम्या आणखी आहेत...